
SSMB29 : राजामौलींच्या १००० कोटींचं बजेट चित्रपटाचा’बाहुबली’पेक्षाही भव्यसेट!
Larger Than Life चित्रपटांचा अनुभव देणारे दिग्दर्शक एस.एस.राजामौली (S. S. Rajamouli) लवकरच त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दितील सर्वात महागडा आणि भव्य चित्रपट घेऊन येत आहेत… आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत ७००-८०० कोटींचा खर्च करुन चित्रपट तयार केले गेले; मात्र आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ज्याचं बजेट १००० कोटी आहे असा SSMB29 मेकींगच्या प्रोसेसमध्ये आहे… (SS Rajamouli’s Films)

राजामौली यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) झळकणार आहेत… या चित्रपटासाठीचा भव्य सेट राजामौली यांनी हैदराबादमध्ये उभारला असून RRR किंवा बाहूबली चित्रपटांनाही मागे टाकणारा असा या चित्रपटाचा सेट सध्या फोटोंद्वारे व्हायरल झाला आहे…(Big Budget film in the history of indian cinema)

‘एसएसएमबी २९’ या चित्रपटासाठी राजामौली यांनी हैदराबादमध्ये भव्य सेट उभारण्याची तयारी सुरु केली आहे. रामोजी फिल्म सिटीत चक्क अख्खी वाराणसी उभी केली जात असल्याचं व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे… या सेट तयार करण्यासाठी तब्बल ५० कोटींचा खर्च केल्याचं सांगितलं जात असून आता प्रेक्षकांनी उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे…(Tollywood movies)

दरम्यान, SSMB29 हा एक फॅंटसी अॅडव्हेंचर चित्रपट असून या चित्रपटाची कथा वाराणसीशी जोडली गेली आहे… या चित्रपटासाठी संपूर्ण काशी राजामौली यांनी हैदराबादमध्ये उभारली असून आपल्या चित्रपटाच प्राचीन काळ दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे…आत्तापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत भव्य चित्रपट साकारले गेले आणि जितकी भव्यता कथानकात होती अगदी त्याच तोडीस तोड सेट देखील उभारले गेले होते…
२००२ मध्ये आलेल्या देवदास चित्रपटासाठी तब्बल १२ कोटींचा खर्च करुन चंद्रमुखीची कोठी तयार करण्यात आली होती.. इतकंच नाही तर ‘बाजीराव मस्तानी’, ‘हिरामंडी’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांचे सेट्स तयार करण्यासाठी देखील २०-२५ कोटींचा खर्च केला गेला आहे..त्यामुळे आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील १००० कोटींचं बिग बजेट असणारा चित्रपट कधी रिलीज होणार आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन किती करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत…(Bollywood films)
================================
=================================
ऑस्कर पुरस्कार विजेते एस.एस.राजामौली यांनी २००१ मध्ये स्टुडंट नंबर १ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आपला प्रवास सुरु केला होता… त्यानंतर मगधीरा, बाहूबली, आर.आर.आर असे बिग बजेट आणि स्वप्नवत चित्रपट प्रेक्षकांना देणारे राजामौली लवकरच ‘बाहूबली’ (Bahubali movie) १ आणि २ या दोन्ही भागांचे मिळून एक भव्य चित्रपट लवकरच आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सीक्वेल्सचे एकत्रिकरण करुन एकच चित्रपट भविष्यात येऊ शकतो आणि त्याची सुरुवात राजामौली बाहूबलीच्या निमित्ताने करत आहेत असं म्हटल्यास हरकत नाही…(Entertainment news)