Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Star Pravah Parivar Award 2025: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ मध्ये या कलाकारांनी मारली बाजी !!
Star Pravah Parivar Award 2025 नुकताच जल्लोषात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे पाचवं वर्ष. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात आता होऊ दे धिंगाणा ठरला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम तर महाराष्ट्राची महामालिका ठरली ठरलं तर मग. प्रेक्षकांनी केलेल्या भरघोस व्होटच्या माध्यमातून ठरलं तर मग मालिकेला सलग दुसऱ्या वर्षी महामालिकेचा पुरस्कार बहाल करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्याचा मान महामालिकेसाठी व्होट करणाऱ्या दोन भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात आला.(Star Pravah Parivar Puraskar 2025)

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार पटकावला घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील जानकीने, तर ऋषिकेश ठरला सर्वोत्कृष्ट पती. प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कला यांना सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार देण्यात आला. येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया आणि मंजिरी ठरली सर्वोत्कृष्ट जोडी तर तू ही रे माझा मितवा मालिकेतील अर्णव – ईश्वरीला मिळाला सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडीचा पुरस्कार. मुरांबा मालिकेतील अक्षय-रमाची जोडी ठरली महाराष्ट्राची रोमॅण्टिक जोडी.

आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेतील यशवंत आणि शुभा यांना सर्वोत्कृष्ट आई-बाबा पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट सासू आणि सासरे ठरले साधी माणसं मालिकेतील निरुपा आणि सुधाकर. यंदाचा सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या आणि ठरलं तर मग मधल्या प्रिया यांना विभागून देण्यात आला. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील पार्थ, जीवा, युग आणि नंदिनी, काव्या, आरुषी यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट भावंड पुरस्कार.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परिवार ठरला लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील चांदेकर परिवार. प्रवाह परिवारात नव्याने सामील झालेल्या लग्नानंतर होईलच प्रेम मधील नंदिनी आणि थोडं तुझं आणि थोड माझं मालिकेतील तेजस यांना सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरस्कार देण्यात आला. आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचीच मनं जिंकणारी साधी माणसं मालिकेतील मीरा ठरली सर्वोत्कृष्ट मुलगी तर समृद्धी केळकरने पटकावला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार. फेव्हरेट ग्लॅमरस फेस पुरस्काराचे मानकरी ठरले थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतील मानसी आणि तू ही रे माझा मितवा मालिकेतील अर्णव.
===================================
===================================
परिक्षकांच्या पसंतीचा कौल घेऊन सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेला देण्यात आला. उदे गं अंबे मालिकेलाही विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्टार प्रवाह परिवाराची धडाकेबाज सदस्य ठरली अबोली तर आकाश, भूमी आणि रागिणी यांना त्रिकुट नंबर वन पुरस्कार देण्यात आला. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.