Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय गीत!

 क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय गीत!
बात पुरानी बडी सुहानी

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय गीत!

by धनंजय कुलकर्णी 13/02/2026

गुलजार एक प्रतिभावान गीतकार आणि संवेदनशील कवी. त्यांच्या गीतांनी भारतीय चित्रपट सृष्टीचे दालन समृद्ध बनले आहे. आंधी, घर, गोलमाल , थोडी सी बेवफाई, इजाजत, मासूम या सिनेमातील त्यांनी लिहिलेल्या अजरामर गीतांनी रसिकांना निहायत खूष केले.  त्यांच्या 1982 साली प्रदर्शित झालेले ‘नमकीन’ या चित्रपटातील एका गाण्याचा हा किस्सा आहे. या सिनेमातील  सर्व गाणी गुलजार यांनी लिहिली होती तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. या सिनेमातील एका गाण्याच्या एक ओळीची ही भन्नाट गोष्ट आहे. या ओळीची पाळमुळे शोधायची झाल्यास शंभर दीडशे वर्ष मागे जावे लागते.

‘नमकीन ’या सिनेमात किशोरकुमार यांनी गायलेलं एक गीत होतं. ‘राह पे चलते है यादो मे बसर करते है खुश रहो अहल ए चमन  अब हम तो सफर करते है ….’  या गाण्यातील ‘खुश रहो अहल ए वतन अब हम तो सफर करते है ‘ ही ओळ गुलजार यांनी दुसऱ्या एका कवीच्या कवितेतून घेतली होती.  उर्दू साहित्यामध्ये हा प्रकार अगदी नॉर्मल आहे ,कॉमन आहे.  जिथे एखादा शायर एक दुसऱ्या शायराच्या काही ओळी आपल्या शायरी मध्ये घेत असतो. ‘मौसम’ (1975) या गुलजार यांच्या चित्रपटातील ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ या गाण्यातील ‘दिल ढूंढता है..’ हा मिस्रा  मिर्झा गालिब यांचा आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.

आता येऊत आपण आपल्या मूळ गाण्याकडे. नमकीन या चित्रपटातील ‘खुश रहो अहल ए वतन  अब हम तो सफर करते है..’ ही ओळ गुलजार यांची नव्हती मग ही ओळ कुणी लिहिली होती? याचा शोध घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला शे दिडशे वर्ष मागे जावे लागते. 1975 साली ‘आंदोलन नावाचा एक चित्रपट आला होता. लेख टंडन दिग्दर्शित या सिनेमाला जयदेव यांचे संगीत होते. या चित्रपटात राकेश पांडे वर चित्रित भूपेंद्र यांनी ‘खुश रहो अहल ए वतन  अब हम तो सफर करते है..’ हे गाणं गायलं होतं. या सिनेमाच्या  ओपनिंग क्रेडिट्स मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला या सिनेमाचे गीतकार पंडित रामप्रसाद बिस्मिल आहेत असे कळते.  

पंडित रामप्रसाद बिस्मिल हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे सेनानी होते. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी ब्रिटिशांनी त्याना फासावर लटकवले होते.  त्यांच्या अनेक गीतांनी स्वातंत्र्यसनिकांचे स्फुल्लिंग पेटवले होते. शहीद भगतसिंग यांनी आपल्याला फाशी देण्यापूर्वी त्यांच्या भावाला कुलतार सिंग यांना जे पत्र लिहिलं होतं त्यात देखील ‘खुश रहो अहल ए वतन  अब हम तो सफर करते है..’ या ओळींचा उल्लेख होता! मग या पंक्ती शहीद भगतसिंग यांच्या होत्या का? पण याचा आणखी शोध घेतला तर असे लक्षात येते की या ओळी पंडित शहीद भगत सिंग यांच्या नव्हत्या तसेच रामप्रसाद बिस्मिल यांच्या देखील नाहीत!  मग कुणाच्या आहेत? या साठी आपल्याला आणखी काही वर्षे मागे जायला लागतं.  

================================

हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

=================================

1857 साली जो भारतातील पहिला ब्रिटिशांच्या विरुद्धचा स्वातंत्र्य संग्राम /उठाव झाला होता त्या वेळी अवधचा आखरी नवाब वाजीद अली शहा यांनी ज्या वेळेला 7 मार्च 1856 ला आपल्या प्यारे लखनौ ला सोडून जावं लागत होते त्या वेळी त्यानी लिहिलं होतं ‘दरो दीवार के हसरत से नजर करते है खुश रहो अहल -ए वतन अब हम तो सफर करते है.’ नंतर ही पंक्ती खूपच लोकप्रिय झाली आणि पुढची अनेक वर्ष साहित्यिकांच्या रचनात/ चर्चेत दिसू लागली. या ओळीचा मोह गुलजार यांना देखील आवरलं नाही . तब्बल जवळपास दिडशे वर्षानी  त्यांनी आपल्या चित्रपट गीतात त्याचा समावेश केला. अशा प्रकारे आधी शायरी ते क्रांती आणि नंतर क्रांती ते सिनेमा पर्यंत याचा प्रसार झाला!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity News Entertainment Gulzar gulzar songs namkeen movie sanjeev kapoor Shabana Azmi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.