‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आर.डी ह्यांच ‘सागर किनारे’ हे गाणं एसडींच्या ह्या गाण्यावरून प्रेरित होऊन तयार झाले आहे.
मध्यंतरी ’मुझे रात दिन, बस मुझे चाहती हो’ या संघर्ष (१९९९) च्या सोनू निगमने गायलेल्या गाण्याने मोठी लोकप्रियता हासिल केली होती. जतिन ललित ने स्वरबद्ध केलेलं हे रोमॅंटीक गाणं तरूणाईच्या ओठावर आजही आहे. पण तुम्हाला आठवतं का हे गाणं ओ पी नय्यर यांच्या एका जुन्या गाण्याची सही सही कॉपी होतं. जॉय मुखर्जी आणि साधनाच्या ’एक मुसाफिर एक हसीना’ (१९६२) या सिनेमातील ’ये मुझे देखकर आपका मुस्कुराना मुहोब्बत नही है तो फिर और क्या है… हां मुझे देखकर’. एकाच मीटर मध्ये बनलेली ही दोन्ही गाणी रसिकांना आवडून गेली. आता याला चोरी म्हणायचे की प्रेरणा हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवावा. पण या निमित्ताने एकाच चालीवर बेतलेली काही गाणी चटकन आठवतात.
एकाच चालीवर लतानेच तीनदा वेगवेगळी गाणी गायली आहेत. सचिन देव बर्मन यांच्या ’नौजवान’ (१९५१) सिनेमात लताचं एक अप्रतिम प्रेम गीत होतं. ’ठंडी हवाये, लहराके आये, रूत है जवां तुमको यहां कैसे बुलाये’ यातील सुरूवातीचे लताचे आलाप ’ला ला ला’ हे आलाप सी रामचंद्र यांनी सचिनदा यांना सुचविले होते. याच गाण्याच्या चालीवर रोशन यांनी ’ममता’ (१९६६) मध्ये एक गाणं रचलं ते देखील अप्रतिम बनलं गाणं होतं ’रहें ना रहें हम महका करेंगे बन के कली, बन के सबा, बाग-ए-वफ़ा में’ पुढे राहुल देव बर्मन यांनी ’सागर’ (१९८५) या सिनेमात याच चालीवर गाणं तयार केलं लता व किशोर यांनी स्वतंत्र गायलेलं ’सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नही तो मेरा कोई नही…’ गंमत म्हणजे तिन्ही गाणी लताने गायली व तिन्ही गाणी सुपर हिट ठरली! याच चालीवर आणखी काही गाणी आहेत. (यही है तमन्ना – ग्यारह हजार लडकीया, घर से निकलतेही – पापा कहते है, तेरा दिल कहां है – चांदनी चौक, हमे और जीने की चाहत न होती – अगर तुम न होते).
हिंदीत अशी खूप उदाहरणे आहेत. कित्येक भारतीय चित्रपट गाण्यांची चाल पाकिस्तानात जशीच्या तशी वापरली गेली. काही वेळा उलट देखील झाले आहे. इतर पाश्चात्य संगीताच्या धून देखील खूप ठिकाणी वापरल्या आहेत. (आठवा कम सप्टेंबर) भारतात प्रादेशिक भाषेतील किंवा लोकसंगीताच्या चाली सर्रास इतरत्र वापरल्या जातात. आता मी तुम्हाला एका मराठी भावगीतावरून घेतलेल्या व अफाट लोकप्रिय ठरलेल्या दोन गाण्यांची आठवण करून देतो. ही गाणी एवढी गाजली की त्याचं मूळ ज्या भावगीताच्या चालीत आहे ते भावगीत देखील लोकांना आठवत नाही. गजानन वाटवे यांच एक भावगीत चाळीसच्या दशकात आलं होतं ’फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या चालीवर बेतलेली दोन गाणी पहा. एक होतं बी आर चोप्रांच्या ’धूल का फूल’ (१९५९) मधील ’झुकती घटा गाती हवा सपने सजाये, नन्हा सा दिल मेरा मचल मचल जाये’ (सं एन दत्ता) आणि दुसरं गाणं होतं राज कपूर, नर्गीस च्या शंकर जयकिशनने संगीत दिलेल्या ’चोरी चोरी’ (१९५६) मधील ’पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे, आज मै आजाद हूं दुनिया के चमन में …’ गजानन वाटवे रॉक्स!