Stree 2 On OTT: अखेर ओटीटीवर प्रदर्शित होत आहे ‘स्त्री २’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट थिएटरमध्ये सरकटाची दहशत पसरवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली. तसेच या चित्रपटाने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जवान चा विक्रम मोडला आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. तेव्हा जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन स्त्री २ पाहण्याची संधी गमावली असेल तर टेन्शन घेउ नका. आता तुम्ही ओटीटीवर हा सिनेमा पाहू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा थोडा खाली करावा लागेल.(Stree 2 On OTT)
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री २’ सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम ही प्रस्थापित केले आहेत. सुमारे ४२ दिवसांपासून हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू असून भारतात आतापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन सुमारे ५८० कोटी रुपये आहे. ‘स्त्री २’ने शानदार कलेक्शनने जवळपास सर्वांची मने जिंकली आहेत. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागूव राहीली होती.
‘स्त्री 2′ हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर प्रसारित होत आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिक्वेल अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप ‘स्त्री २’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी २७ सप्टेंबरपासून म्हणजे आज पासूव हा चित्रपट स्ट्रीमिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, ती भाडेतत्त्वावर असेल.अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट तुम्ही ३४९ रुपयांना भाड्याने घेऊ शकता. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.(Stree 2 On OTT)
===============================
===============================
‘स्त्री 2’ हा 2018 साली आलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री’चा दुसरा भाग आहे, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 180.76 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. पहिला भाग तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारवर पाहू शकता.अजूनही हा सिनेमा चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत असल्याने या चित्रपटाचे ओटीटी प्रदर्शन काही दिवस लांबणीवर पडण्याची ही शक्यता आहे. मात्र हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये ओटीटी रिलीज होण्याची शक्यता ही दर्शवण्यात आली होती.