Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हॉटेल मॅनेजमेंट ते अभिनय

 हॉटेल मॅनेजमेंट ते अभिनय
टीव्ही वाले मिक्स मसाला

हॉटेल मॅनेजमेंट ते अभिनय

by गणेश आचवाल 06/11/2020

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आदित्य इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अंबर गणपुले. अंबर मुळात पुण्याचा आहे आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. ‘तू तिथं मी’ या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. अंबर जेव्हा अकरावीत  होता, तेव्हा एका एकांकिका स्पर्धेमध्ये ‘नदीकाठचा प्रकार’ नावाच्या एकांकिकेत त्याने काम केलं होतं. त्यात त्याला बक्षीस मिळालं आणि मग तो  पुण्यातील ‘समन्वय’ या संस्थेशी जोडला गेला. त्याने अनेक वर्षे पुण्यातील प्रायोगिक नाटकातून भूमिका देखील केल्या. त्याची पहिली मालिका ‘ती फुलराणी’ .त्यात त्याने ‘कुमार ‘ नावाची व्यक्तिरेखा देखील केली होती. ‘ती फुलराणी’ मालिका संपत होती, तेव्हा  पौर्णिमा मनोहर यांनी अंबरला  विचारले की पुढे तुला आणखी काही मालिका करायला आवडतील का? अंबरला पौर्णिमा कडून कळले की त्यांची बहीण  अपर्णा केतकर या एका नवीन मालिकेच्या निर्मितीत व्यस्त आहेत आणि त्याकरिता ऑडिशन्स सुरु आहेत. अंबरने फोटो पाठवले, ऑडिशन दिली आणि ‘रंग माझा वेगळा’ मधील ‘आदित्य इनामदार’ या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.

अंबर म्हणतो, ‘ही आदित्यची व्यक्तिरेखा खूप आव्हानात्मक  आहे. आई जे सांगेल ते करणारा, आईवर पूर्ण विश्वास असणारा, श्रीमंतीत वाढलेला असा हा ‘ममाज बॉय’ आहे. आपली आई जे करते ते बरोबरच करते, असा या ‘आदित्य’ चा विश्वास आहे. सुरुवातीला हर्षदा खानविलकर यांच्या मुलाची भूमिका करायची आहे, हे कळल्यावर दडपण आलं होतं. पण जसजसे शूटिंग चालू झाले, तसतसे हर्षदा खानविलकर या किती मनमिळावू आहेत, हे जाणवले. या क्षेत्रात इतकी वर्षे कार्यरत असून स्वभावाने अतिशय प्रेमळ, स्पॉटदादांपासून सर्वांची प्रेमाने विचारपूस करणाऱ्या, सहकलाकारांना सांभाळून घेणाऱ्या हर्षदा खानविलकर आहेत., हे लक्षात आले.  या मालिकेमुळे खरोखरच आमचे एक कुटुंबच झाले आहे. “अंबरने मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इंटर्नशिप सुद्धा केली आहे. त्यांच्या कुटुंबाचा पुण्यात केटरिंगचा व्यवसाय देखील आहे. त्याला स्वतःला उत्तम स्वयंपाक करता येत असल्याने कधीकधी तो सुद्धा सेटवर एखादा
पदार्थ तयार करून आणतो. तर कधी मुंबईतल्या रूममेट्स साठी जेवणही करतो. ‘रंग माझा वेगळा’ च्या सर्व कलाकारांशी त्याचे मैत्रीचे नाते आहे. तो म्हणतो की या मालिकेत बरेचसे  कलाकार हे मुळात मुंबईचे आहेत आणि तो पुण्याचा आहे. अनेकदा आशुतोष त्याला सेटवर आपल्या कारने घेऊन जातो, तर कधीकधी इतर कलाकार देखील त्याच्यासाठी डबा आणतात.
‘रंग माझा वेगळा ‘ या मालिकेने अंबरला एक नवीन ओळख दिली, हे नक्की.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment marathi Show
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.