‘P.S.I Arjun Marathi Movie मधील प्रमोशनल साँगला ‘Pushapa’फेम नकाश अजीज

Chhaava : शुभांगी गोखलेंनी जावयाचं केलं कौतुक,“त्याला बघुन चिड येते म्हणजेच”
विकी कौशल (Vicky Kaushal) याची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असून या चित्रपटाने बाहुबली २, जवान, पठाण चित्रपटांचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात प्रत्येक कलाकारांनी त्यांची कामं उत्कृष्ट केली असून नकारात्मक भूमिका साकरणाऱ्या सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये (Sarang Sathye) यांच्या कामांचं विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, सुव्रत जोशीच्या सासूबाई ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी पहिल्यांदाच छावा चित्रपटाबद्दल व्यक्त होत जावयाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
‘छावा’ (Chhaava) चित्रपटात अभिनेता सुव्रत जोशीने (Suvrat Joshi) कान्होजी शिर्केंची तर सारंग साठ्ये गणोजी शिर्केंची भूमिका साकारली आहे. ‘छावा’ चित्रपटातील सुव्रतच्या अभिनयाबद्दल टेली गप्पाशी बोलताना शुभांगी गोखले म्हणाल्या की,“खूप अभिमान वाटतो. सुव्रत एक उत्तम नट आहेच. तो अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर झळकणार आणि अजून कळणार. त्याची ‘छावा’ चित्रपटात नकारात्मक भूमिका आहे. सारंग आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो, चीड येते. हेच यश आहे आणि दोघांनी ते करण खूप महत्त्वाचं होतं. तसंच ‘छावा’ चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.”(Chhaave Movie)

शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिका विश्वात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांची श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आजही लोकप्रिय आहे. सध्या शुभांगी गोखले ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर रंगभूमीवर ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक सादर करत आहेत. (Marathi celebrities)
===========
हे देखील वाचा :Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
===========
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना शंभूराजेंची पत्नी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये पाहायला मिळत आहे. छावा चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५३५.५५ कोटींची कमाी केली आहे.(Chhaave Box Office Collection)