Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Subodh Bhave दिसणार ‘सकाळ तर होऊ द्या’ या नव्या चित्रपटात!
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांना अचंबित करत आहे… लवकरच सुबोध भावे एका नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे… यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री मानसी नाईक दिसणार आहे…खरं तर, काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच अनोखे शीर्षक असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, या मराठी चित्रपटाचं चित्रिकरण मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं असून अतिशय वेगळ्या जॅानरच्या या चित्रपटात सुबोध आणि मानसी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच ‘सकाळ तर होऊ द्या’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वास्तव परिस्थितीला सामोरे जात, तसेच असंख्य अडचणींवर मात करत जगण्याला नवी दिशा देणारी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या चित्रपटाला हिंदीतील दिग्गज कलाकारांची साथ लाभली असून श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे. नम्रता सिन्हा यांनी आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यांसारख्या अनेक अजरामर हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता नम्रता सिन्हा यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आजवर हिंदीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आलोक जैन यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’चे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
================================
हे देखील वाचा : Border 2 मध्ये वरुण धवनसोबत झळकणार ही अभिनेत्री!; अर्जून रामपाल सोबत केलं आहे काम….
=================================
तसेच, विशेष म्हणजे हिंदीतील संगीतकार हिमेश रेशमिया यांची हिमेश रेशमिया मेलडीज या सिनेमातील गाणी रसिकांच्या भेटीला आणणार आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेली ‘सकाळ तर होऊ द्या’मधील गाणी संगीतकार रोहित राऊत यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शित होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi