Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Subodh Bhave : ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात झळकतेय सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक
अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदाच ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत… काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं… आणि आता या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीच्या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे… या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावतेय…

दरम्यान, ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं लग्नानंतरच्या परिस्थितीचा आरसा दाखवणारं आहे. सुबोध भावेच्या मनातील वैताग, गोंधळ आणि त्याच्या प्रतिक्रियांचा एक मिश्कील कोलाज या गाण्यातून मांडण्यात आला आहे.
================================
हे देखील वाचा: ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल
=================================
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल आहेत. साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत, तसेच सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi