Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”

Subodh Bhave : “महाराष्ट्रात हिंदी बोला मराठी कळत नाही हे तोऱ्यात बोलू नका”
मराठी-हिंदी भाषा वाद आता दिवसागणिक जरा चिघळत चालला आहे… महाराष्ट्रात राहून मराठी बोलता आलीच पाहिजे हा प्रत्येक मराठी माणसाचा अट्टाहास ग्राह्य आहेच… यावर कलाकारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून यात बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग आहे… आता नुकतंच या विषयावर अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आपलं मत मांडलं असून, “महाराष्ट्रात येऊन तुम्ही आम्हाला ‘हिंदी बोला मराठी नाही'”, असं परखड शब्दात तो व्य झाला आहे.. तसेच, सगळ्यांचा सध्या महाराष्ट्र का हवाय याचं उत्तरही त्याने एका मुलाखतीत दिलं आहे…

‘फिल्मीबीट प्राइम’शी बोलताना सुबोध भावे म्हणाला की,”महाराष्ट्रात येऊन तुम्ही आम्हाला ‘हिंदी बोला मराठी नाही’ असं म्हणायचं नाही, ते उत्तर प्रदेशात. जेव्हा आम्ही तिकडे येऊ, तेव्हा आम्ही तुमच्याशी मराठीत नाही तर हिंदीमध्येच बोलू. कारण, तुम्हाला हिंदी समजते. पण, तुम्ही महाराष्ट्रात येऊन ‘हिंदीत बोला मराठी कळत नाही’, असं तोऱ्यात ऐकवू नका. तर हा एक अपमान आहे. सन्मान तेव्हाच होतो, जेव्हा कोणी म्हणतं ‘मला मराठी येत नाही, कृपया शिकवा’. तर आम्ही शिकवू. पण जर तुम्ही अपमान केलात, तर मग उत्तरही त्याच भाषेत मिळेल”.
================================
=================================
तर सकाळला दिलेल्या मुलाखतीत त्याने सगळ्यांनाच महाराष्ट्र का हवा आहे? याचं उत्तर देत म्हटलं की,अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, “सध्याच्या काळात महाराष्ट्राला महत्त्व आलं आहे. कारण संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज या सर्व मंडळींनी महाराष्ट्रात प्रेमाची आणि सर्वसमावेशक वृत्तीची बीज रोवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राष्ट्र उभा करताना संतांच्या विचारसरणीचाच फायदा झाला. संतांनी पेरलेलं हे जे बीज आहे ते एकमेकांविषयी प्रेमाचं वात्सल्याचं ममतेचा असल्यामुळे आज महाराष्ट्र हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतोय”.

दरम्यान, सुबोध भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत झळकणार आहे…तसेच, त्याचा संत तुकाराम हा आगामी हिंदी चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi