Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी

Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार

बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी;

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’

Parinati Marathi Movie Trailer: दोन सशक्त स्त्रियांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या परिणती

Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका

राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘प्लस साइज फिगर’ला स्वत:चं बलस्थान बनविणारी यशस्वी मॉडेल: अश्विनी लोकरे

 ‘प्लस साइज फिगर’ला स्वत:चं बलस्थान बनविणारी यशस्वी मॉडेल: अश्विनी लोकरे
गोष्ट चमकत्या ताऱ्यांची

‘प्लस साइज फिगर’ला स्वत:चं बलस्थान बनविणारी यशस्वी मॉडेल: अश्विनी लोकरे

by अभिषेक खुळे 30/07/2022

कितीतरी वेळापासून अश्विनी स्वत:ला आरशात न्याहाळत होती. जुळ्यांच्या प्रेग्नन्सीमुळे पोटावर आलेले स्ट्रेचमार्क, स्थूल झालेलं शरीर पाहून आत्मविश्वास कुठंतरी डळमळत चालला होता. काही क्षण असेच गेले. तिनं स्वत:च्याच डोळ्यांत डोळे टाकून पाहिलं. एका ठाम निर्धारानं स्वत:लाच स्माइल दिली अन् पटकन तेथून निघाली, स्वप्नपूर्तीच्या दिशेनं. (Success Journey of Ashwini Lokare)

प्रारब्धानं आपल्याला दिलेल्या काही कमतरतांचा न्यूनगंड बाळगत बसायचा की त्या कमतरतांनाच ताकद बनवून स्वत:ला सिद्ध करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अश्विनीनं ती ताकद पेलली. म्हणूनच आज ती फॅशन अन् मॉडेलिंग जगतात यशस्वीपणे वावरत आहे. मॉडेलिंग म्हटलं की, कमनीय बांध्याच्या मुली एवढंच चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र, अश्विनी लोकरे ‘प्लस साइज’ मॉडेलिंग इव्हेंट्समधून आत्मविश्वास गमावलेल्या महिला, मुलींमध्ये बळ पेरू पाहात आहे.

अश्विनी खरंतर इंजिनीअर. एका मोठ्या कंपनीत नोकरी अन् मॉडेलिंग असं तिचं सुरू आहे. ‘इंजिनीअर बाय ॲक्सिडंट, मॉडेल बाय चॉइस’ असं सांगून ती बरंच काही बोलून जाते. वडील सेवानिवृत्त तर आई गृहिणी. अशा मध्यमवर्गीय घरात अश्विनी जन्मली. शाळेत असताना नाटकं, भाषणं वगैरेंमध्ये डेअरिंग नव्हतं. ते केलंही नाही. मात्र, मॉडेलिंग, डान्स वगैरे असला, तर मात्र ती त्यात आवर्जून सहभागी व्हायची. घरच्यांच्या सांगण्यावरून नाखुशीनंच इंजिनीअरिंग केलं. त्यात ती यूनिव्हर्सिटीतून टॉप आली. नोकरीही सुरू झाली. (Success Journey of Ashwini Lokare)

यादरम्यान काही कटू प्रसंग आले. त्यातून तिला सावरायचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुळी मुले झाली होती. त्यांच्या संगोपनात बराच वेळ गेला. कधीकधी नैराश्याचं वातावरण तुमच्यात एखादी ठिणगी पेटवून जातं. अश्विनीचंही तसंच झालं. इतक्या वर्षात आपली काही स्वप्नं अपुरीच राहिली, हे तिला जाणवू लागलं. मॉडेलिंगची आवड होतीच. त्यादिशेनं वाटचाल करायचं तिनं ठरवलं. स्वत:ची स्थूल फिगर पाहून हिरमुसायला होत होतं. त्या नादात तिनं केसांचा बॉयकट केला. तासंतास आरशासमोर असायची ती. ‘हे तर मला जमतं. मग मी थांबले कशासाठी?’ असा विचार एकदा मनात आला अन् मॉडेलिंग जगताकडे ती वळती झाली.

मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स येतात कसे, हे शोधण्यात सहा-सात महिने गेले. सोशल मीडियावर मॉडेलिंगसंबंधातील पेजेस ती सतत चाळू लागली. कुणी इनबॉक्समध्ये येऊन विचारायचं, ‘कोलॅबरेशन’ करणार का, त्यावेळी या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता. ‘कोलॅबरेशन’ म्हणजे फोटोशूटचे पैसे तो फोटोग्राफर अन् मॉडेल या दोघांनीही एकमेकांकडून घ्यायचे नाहीत, नवखे म्हणून काम करायचं, हेही उशिराच कळलं. त्यावेळी पोर्टफोलिओही नव्हता. काही ठिकाणी तर पोर्टफोलिओ करून देतो, संधी मिळवून देतो वगैरे सांगून आर्थिक फसवणूकही झाली. मात्र, ‘असे धक्के घेतल्याशिवाय माणूस शिकत नाही’, असं अश्विनी सांगते. (Success Journey of Ashwini Lokare)

आता थोडं थोडं कळू लागलं होतं. एका ब्रँडच्या ऑडिशनला अश्विनी गेली. ते शूट जरा बोल्ड होतं. ते यूट्युबवर आलं. ते घरी आई-बाबांनी पाहिलं. सुरुवातीला ते काही बोलले नाहीत. मात्र, नंतर नातेवाइकांपर्यंतही ते पोहोचलं अन् कुजबूज सुरू झाली. तेव्हा आई-बाबांनी आपली भावना बोलून दाखविली. ‘बोल्ड जरा कमी करेन’, असं अश्विनीनं त्यांना समजावलं. मॉडेलिंग जगतात आता तिचा शिरकाव यशस्वीरीत्या झाला होता. कित्येक ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग सुरू झालं. हे तिच्यासाठी बूस्टिंग होतं.

स्वत:ची फ्रेम निर्माण करा

“माझं शरीर पाहून मॉडेलिंगची संधी मिळेल की नाही, अशी शंका मला होती. मात्र, जिद्द महत्त्वाची असते. त्यासोबत महत्त्वाचा असतो तो स्वत:वरील विश्वास. मी पहिल्यांदा ‘प्लस साइज’च्या रॅम्पवर चालले, तेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही. मात्र, आत्मविश्वास कमालीचा वाढला. ‘मी हे करू शकते’, याची खात्री पटली. लठ्ठपणालाही एक ‘शेप’ असावा लागतो. सोबतीला लागतो, तो ॲटिट्युड. या बाबींकडेही कटाक्षानं लक्ष दिलं. 

या फॅशन जगतात फक्त कमनीय बांध्यालाच महत्त्व आहे, असं नाही. झिरो फिगर नसलेल्या कित्येक जणी आज रॅम्पवर यशस्वीरीत्या वावरत आहेत. नेहा धूपिया व अन्य काही जणींनी ते सिद्धही करून दाखवलंय. आपण छान छान दिसलं अन् छान छान असलं की, लोकांना विश्वास यायला लागतो. त्यामुळे स्वत:ची फ्रेम स्वत:च निर्माण करावी लागते”, असं अश्विनी सांगते. परदेशात प्लस साइज मॉडेलिंग इव्हेंट्स भरपूर होतात. भारतात तुलनेनं हे प्रमाण खूपच कमी आहे, ते वाढलं पाहिजे, अशी तिची अपेक्षा आहे. (Success Journey of Ashwini Lokare)

सगळे चेहरे सारखे नसतात…

“या क्षेत्रात काम करताना जसे काही चांगले तसेच वाईट अनुभवही आले. काही ठिकाणी गेल्यावर कधी अप्रत्यक्षपणे, तर कधी थेट ‘कॉम्प्रमाइज’साठी विचारलं जायचं. त्यावेळी मी स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायचे. नंतर तर याची सवयच झाली होती. त्यामुळे समोरच्यानं विचारायच्या आधी मीच विचारून टाकायचे, ‘कॉम्प्रमाइज करावं लागेल का?’ जेणेकरून विषय तिथंच संपवायचा. म्हणजे दोघांच्याही वेळेचा चुराडा व्हायला नको”, असं अश्विनी थेट सांगते. 

“कित्येकदा माझ्या इनबॉक्समध्ये येऊन सतरा-अठरा वर्षांच्या मुली मॉडेलिंगविषयी विचारतात, या क्षेत्रात येण्याची इच्छा व्यक्त करतात. टिप्सही मागतात. मात्र, तुम्ही तुमच्या वयात प्राधान्य कशाला द्यायचं याचा विचार करा, शिक्षणाकडे आधी लक्ष द्या, हेच त्यांना माझं सांगणं असतं. या क्षेत्रात सगळेच चेहरे सारखे नाहीत. त्यामुळे जपूनच वाटचाल करा. सगळं काही एका रात्री मिळत नसतं. जर एका रात्रीतच हवं असेल तर त्याची वेगळी किंमत मोजावी लागते. त्यामुळे मेहनत व हिमतीनं समोर जाऊन टिकायचं की सर्व लवकर मिळवण्याच्या नादात दलदलीत फसायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं’, असं ती नमूद करते.

आता जमाना बदलला आहे. करोना लॉकडाउननंतर तर स्थिती वेगळीच झाली आहे. सोशल मीडिया पाण्यासारखा पसरलाय. आता तुमचे सोशल मीडियावर पेज असले पाहिजे, अकाउंट नेमला ब्ल्यू टिक, अन् भरपूर फॉलोअर्स असले पाहिजेत. स्पर्धा इथंही आहे. त्यात टिकायचं तर स्वत:कडे लक्ष देणं, स्वत:ला सर्व बाबींनी अपग्रेड करत राहणं खूप गरजेचं आहे. इथं तुम्हाला कुणी शिकवत नाही. स्वत:चं स्वत:लाच शिकावं लागतं. पहिलं फोटोशूट अन् दहावं फोटोशूट आपणच आपलं निरखून पाहावं. त्यात बदल दिसतो. अर्थात, कॅमेऱ्यासमोर कसं प्रेझेंट व्हावं, हे आपल्यालाच कळून चुकलेलं असतं, असं अश्विनी म्हणते. (Success Journey of Ashwini Lokare)

अभिनय ठरवला नाही, पण…

बहुतांश मॉडेल्सची पुढची पायरी अभिनयक्षेत्र असते. अश्विनीनं तसा विचार कधीच केला नाही. मॉडेलिंगच तिनं तिचं विश्व मानलं. मात्र, अभिनयाच्या ऑफर्स तिच्याकडे स्वत:हून चालून आल्या. काही शॉर्टफिल्म्स तिनं केल्यात. शिवाय, एक मल्याळम सिनेमा आणि एका वेबसीरिजचा प्रस्ताव तिच्याकडे आहे. त्यासाठी आधी स्वत:ला तयार करावं लागेल, असं ती सांगते. 

सिनेमा तिचं प्रचंड आवडतं माध्यम आहे. जवळपास प्रत्येक सिनेमा ती पाहते. सिनेमाची मजा मोठ्या पडद्यावरच आहे. तिथं गर्दीत बसून चित्रपट पाहिल्याचा फील येतो. प्रेक्षकांकडून टाळ्या, शिट्ट्या, इमोशन्स आदींची लाइव्ह दाद असते, ती इतर माध्यमांत नाही मिळत, असं तिचं मत आहे. (Success Journey of Ashwini Lokare)

मॉडेलमध्ये मिलिंद सोमण, विद्युत जामवाल तर कलाकारांमध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षित हे तिचे आवडते कलाकार आहेत. शिवाय, नोरा फतेहीसुद्धा तिला खूप आवडते. आयुष्यात कुण्या एका व्यक्तीचा प्रभाव नाही. मात्र, तुमच्या आजूबाजूचे, इतरत्र भेटणारे लोकच तुम्हाला वेळोवेळी प्रेरित करीत असतात, असं ती सांगते. 

कर्मावर विश्वास असलेल्या अश्विनीला माणसं वाचायला आवडतं. सध्या नोकरी सांभाळून मॉडेलिंग अशी तिची कसरत सुरू आहे. त्यात ती आनंदी आहे. दोन इंटरनॅशनल रॅम्पवॉक तिनं केले आहेत. आता तिला आंतरराष्ट्रीय मॅगझिनवर झळकायचं आहे. (Success Journey of Ashwini Lokare)

=======

हे देखील वाचा – इंजिनिअर होता होता दिग्दर्शक झाला – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम स्वप्नील वारके

=======

“हाइटने मार खाल्लाय यार”, असं ती म्हणत असली, तरी तिच्यातील आत्मविश्वास अन् गुणांची ‘उंची’ मोठी आहे. स्पष्टवक्ती, गुणी, सदैव जमिनीवर असलेली, नम्र अशी ही अश्विनी लोकरे आत्मविश्वास गमवून बसलेल्या महिलांसाठी प्रेरक आहे. तिच्या क्षेत्रात ती ‘प्लस’आहे, भविष्यातील तिची वाटचाल चमकती आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ashwini Lokare Entertainment marathi model model
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.