
Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी मालिकेत झळकणार !
मराठी चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात आपली खास ओळख निर्माण करणारे कलाकार आता हिंदी मालिकांमध्येही आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्यातच एक नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे सुचित्रा बांदेकर आणि मिलिंद गवळी यांचं. हे दोघंही आता कलर्स टीव्ही वरील नवीन हिंदी मालिकेत ‘मनपसंद की शादी’ या शोद्वारे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. प्रोमोमध्ये सुचित्रा आणि मिलिंद नवरा–बायको म्हणून दिसत आहेत. या कथानकात ते त्यांच्या मुलीच्या, आरोही जी एक एक हुशार इंजिनीयर आहे तिच्यासाठी लग्नासाठी योग्य वर शोधत असतात. पारंपरिक कुटुंबातील आई वडिलांसारखं त्यांचं व्यक्तिमत्व दाखवण्यात आलं आहे, जे मुलीच्या जीवनात स्वतःच्या अपेक्षांची पखरण करू पाहतात. मात्र, आरोही स्वतःच्या पसंतीनुसार जीवनसाथी निवडण्यावर ठाम आहे.(Suchitra Bandekar & Milind Gavali Together)

ही कथा आजच्या तरुण पिढीच्या विचारांना आणि जुन्या पिढीच्या अपेक्षांमधील अंतर अधोरेखित करते. विवाह या सामाजिक संस्थेला केवळ कुटुंबाच्या समाधानाचा विषय न मानता, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि निवडीच्या अधिकाराचा मुद्दा म्हणून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, ही मालिका हिंदी भाषेत असली तरी यात एक मराठी कुटुंब दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची भाषा, स्वभाव, आणि जीवनशैली यांचं खूप नैसर्गिक आणि प्रामाणिक चित्रण बघायला मिळणार आहे. हे या मालिकेचं आणखी एक आकर्षण ठरणार आहे.

या मालिकेत ईशा सूर्यवंशी आरोहीच्या भूमिकेत असून तिच्यासमोर मुख्य नायकाची भूमिका अक्षुन महाजन साकारणार आहे. याशिवाय, स्वाती देवल आणि इरावती लागू यांसारख्या मातब्बर मराठी अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत, जे या मालिकेचं वजन अधिक उंचावणार आहेत. (Suchitra Bandekar & Milind Gavali Together)
=================================
=================================
‘मनपसंद की शादी’ ही मालिका ११ ऑगस्टपासून दररोज रात्री १० वाजता कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पारंपरिक मूल्यं आणि आधुनिक विचारांमधील संघर्ष, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत, आणि अभिनयाचा कस पाहायला मिळणारी ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी अपेक्षा आहे.