Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन!
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिका जहागिरदारच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री अक्षया नाईक आता तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकते आहे. अभिनयातून थोडा ब्रेक घेतल्यानंतर अक्षया पुन्हा नव्या उमेदीने, नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Actress Akshaya Naik)

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका २०२० मध्ये सुरू झाली आणि तब्बल ९८१ भागांनंतर २०२३ मध्ये संपली. त्या मालिकेतील लतिका ही भूमिका अक्षयासाठी केवळ एक पात्र नव्हतं, तर तिचं आयुष्यच होतं. त्या मालिकेनं तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. मालिकेनंतर अक्षयानं थोडी विश्रांती घेतली. त्या काळात तिनं अभिनयापासून दूर राहून स्वतःला वेळ दिला, स्वतःच्या आतल्या कलाकाराला समजून घेतलं.

आता पुन्हा एकदा ती अभिनयाच्या प्रवासात परतली आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ या नव्या मालिकेत ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार असून, अक्षयानं सोशल मीडियावर तिच्या कमबॅकची अधिकृत घोषणा करत लिहिलं “२ वर्षांनंतर पुन्हा एकदा येतेय तुमच्या भेटीला… एका नव्या भूमिकेत.” तिच्या या पोस्टला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे, आणि अनेकांनी तिला परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
===============================
===============================
अक्षया ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती एक उद्योजिकाही आहे. अभिनयातून थोडा ब्रेक घेतल्यानंतर तिनं गोव्यात ‘Naik Home Stay’ नावाचा एक होमस्टे सुरू केला, जो तिच्या बहिणीसोबत ती चालवते. अभिनय आणि व्यवसाय या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये ती स्वतःला पूर्णपणे गुंतवून ठेवते. तिचं पुनरागमन हे प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तिच्या अभिनयात प्रामाणिकपणा, भावनांचा थेट हृदयाला भिडणारा अभिनय आणि एक साधेपणा आहे. लतिका म्हणून जे प्रेम तिला मिळालं, त्याची आठवण आजही लोकांच्या मनात ताजी आहे. आणि आता ती जेव्हा नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे, तेव्हा त्या जुन्या आठवणी जाग्या होतील आणि नवीन प्रेम मिळेल, हे निश्चित.