Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या युद्धावर चित्रपटाचं कथानक आधारित होतं. पण तुम्हाला माहित आहे का सुनील शेट्टीने (Suneil Shetty) आधी बॉर्डर चित्रपट नाकारला होता. काय होतं कारण जाणून घ्या… (Bollywood news)

जे.पी.दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ चित्रपटात सुनील शेट्टीने भैरव सिंह ही भूमिका साकारली होती. अलीकडेच सुनीलच्या आयकॉनिक चित्रपटांबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्यापैकी एक होता ‘बॉर्डर’ चित्रपट. सुनीलने रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, सुरुवातीला जे पी दत्ता यांच्यामुळे ‘बॉर्डर’ चित्रपटाला नकार दिला होता; मात्र नंतर सासूच्या आग्रहामुळे चित्रपट केला होता.(Entertainment news)
सुनील म्हणाला की, “मी भैरव सिंह ही भूमिका नाकारली होती. कारण- मी ऐकले होते की, जेपी दत्ता खूप कडक दिग्दर्शक आहेत. जर ते नाराज झाले, तर ते मला शिवीगाळही करतील. मी स्वतः खूप रागीट स्वभावाचा माणूस होतो.”(Bollywood tadaka)

पुढे सुनील म्हणाला की, “जेपीजी मला भेटायला आले, तेव्हा मी त्यांना सांगितले की, “मी तुमच्याशी बोलेन. पण नंतर मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले की, मी हा चित्रपट करू शकणार नाही. कारण- जर त्यांनी मला शिवीगाळ केली, तर मी हात उचलेन. मला कोणाशीही संबंध बिघडवायला आवडत नाही. म्हणून मी ते विसरून जाण्याचा विचार केला; पण जेपी मला चित्रपटात कास्ट करण्यासाठी ठाम होते आणि त्यांनी ज्या व्यक्तीला संपर्क केला ते माझ्या सासूबाईंना ओळखत होते. (Bollywood masala)
================================
=================================
‘बॉर्डर’ चित्रपटाचा भाग होण्याचा किस्सा सांगताना सुनील पुढे म्हणाला की, मी नाकारलेला चित्रपट माझ्या सासूबाईंकडून माझ्याकडे परत आला. माझ्या सासूबाईंनी मला बसवलं आणि त्या मला म्हणाल्या की, तू हा चित्रपट कर. यावर मी त्यांना म्हणालो की, माझी एक अट आहे. जर ‘अशी’ म्हणजे वाद विवादाची परिस्थिती उद्भवली, तर मी चित्रपट सोडेन”. अखेर सारं काही नीट पार पडलं आणि बॉर्डर चित्रपटाचा सुनील शेट्टी भाग झाला. आणि विशेष म्हणजे प्रत्येक भारतीयाने अफाट प्रेम दिलेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला.