अभिनेता सुनील शेट्टीला टोमॅटोवर केलेल वक्तव्य पडले भारी; मागवी लागली शेतकऱ्यांची माफी
सेलेब्रिटी म्हटल की त्यांच्या कपड्यापासून ट्वीट पर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा तर होणारच.कलाकारांच जेवढ कौतुक होत तेवढ त्यांना ट्रोल ही खेल जात.आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या किमतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याला जोरदार लक्ष्य करण्यात आले होते. अखेर यानंतर सुनील शेट्टी यांनी माफी मागितली असून आणि आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे आणि देशातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा अशी त्यांची नेहमीच इच्छा होती असे ही त्यांनी म्हटले आहे. तर झाल अस होत की, एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल सांगितले होते की, टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे आणि त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी केले आहे. या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आणि ही बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली, हे पाहून शेतकऱ्यांनीही अण्णांवर जोरदार टीका केली आणि सतत ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्याने अखेर याचे स्पष्टीकरण दिले आहे.(Suniel Shetty on Tomato)
सुनील शेट्टी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शेतकऱ्यांची माफी मागितली आणि ते म्हणाले, ”शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांबद्दल मी नकारात्मक विचार करण्याचा विचारही करू शकत नाही. ते नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात आणि त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची इच्छा असते.” तसेच ”हॉटेल व्यावसायिक म्हणून माझा त्यांच्याशी थेट संबंध असून शेतकरी हा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांना दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो.” असे म्हणत सुनील यांनी त्यांची बाजू मांडली आणि माफी मागितली. (Suniel Shetty on Tomato)
=========================
=========================
सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एकेकाळी २० रुपयांना विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर आता २६० रुपयांपर्यंत पोहोचल्यापासून सर्वसामान्यांसह अनेक स्टार्सचीसुद्धा झोप उडाली आहे. याच दरम्यान टोमॅटोच्या वाढत्या किमतींवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाले होते की, “आम्ही ताज्या गोष्टी खातो. ज्या प्रकारे टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत, त्याचा परिणाम आपल्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो खूप कमी खातो.” त्यांचे हे वक्तव्य व्हायरल होताच शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संतोष मुंडे यांनी यावर केवळ टीकाच केली नाही तर अभिनेत्याच्या घरी टोमॅटोही पाठवले होते.