
“पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्या मुलाने खुप काही….”; अहानबद्दल बोलताना Suneil Shetty याला अश्रु अनावर
९०-२००० चं दशकं बॉलिवूडमध्ये गाजवणारा हिरो सुनील शेट्टी (Suneil Shetty) सध्या आपल्या मुलाच्या ‘बॉर्डर २’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. खं तर सुनील शेट्टी याने बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना त्याचा प्रवास सुरु केला होता. आणि आता त्याने अख्ख्या बॉलिवूडला आपल्या अभिनयाने वेडं केलं आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात तो नेपोटिझमबद्दल बोलताना भावूक झाला होता. मुलगा अहान शेट्टी याचा पहिला ‘तडप’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अनुभवलेल्या कठीण काळाबद्दल बोलताना त्याला अश्रू अनावर झाले होते. चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या मुलांना सारं काही सहज मिळतं या विचाराबद्दल बोलताना सुनीने म्हटलं की, “पहिल्या चित्रपटानंतर अहानला खूप मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होते.” आता नेमकं तो काय म्हणाला जाणून घेऊयात… (Bollywood News)
१९९७ मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा दुसरा भाग ‘बॉर्डर २’ (Border 2) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात सुनील शेट्टीचं पात्र शहीद झाल्यामुळे दुसऱ्या भागात तो दिसला नाही. दरम्यान, ‘बॉर्डर २’ च्या टीमसोबत ‘जाते हुए लम्हों’ हे गाणे लाँच करण्यासाठी तो आवर्जून उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान, ‘बॉर्डर’ चित्रपटाचाचा भाग असलेल्या सुनील शेट्टीला आपल्या मुलाबद्दल बोलताना गहिवरून आलं होतं. (Entertainment News) यावेळी बोलताना सुनील म्हणाला की,“हा अहानचा दुसरा चित्रपट आहे आणि त्याला इतका मोठा चित्रपट मिळाला. हा खूप जबाबदारीचा चित्रपट आहे. जेव्हा अहान हा चित्रपट करत होता, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की, ‘अहान, हा फक्त गणवेश नाही. हे लक्षात ठेव’,” हे म्हणताना सुनील शेट्टीला अश्रू अनावर झाले होते. (Ahaan Suneil Shetty)

पुढे मुलाच्या पहिल्या फ्लॉप चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “पहिल्या चित्रपटानंतर, त्याच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये छोटासा ब्रेक आला होता. तुम्हाला माहित आहेच, आपल्या आयुष्यात नेहमीच चढ-उतार येत असतात. सगळे म्हणतात की तो सुनील शेट्टीचा मुलगा आहे, त्यामुळे त्याला खूप काम मिळत असेल. पण कुठेतरी, अहानला आयुष्यात खूप काही अनुभवावे लागले आहे. पण मला आनंद आहे की त्याला ‘बॉर्डर २’ चित्रपट मिळाला. यापेक्षा चांगला चित्रपट त्याला मिळूच शकत नव्हता. आणि मी प्रार्थना करतो की त्याने न्याय दिला असेल आणि तो चित्रपट आपल्या सर्वांसाठी यशस्वी ठरेल”, असं म्हणत तो भावूक झाला होता.
================================
================================
दरम्यान, अहान जे.पी. दत्ता यांच्या १९९७ च्या युद्धपटाचा सिक्वेल असलेल्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांच्यासोबत मोना सिंग, सोनम बाजवा, अन्या सिंग आणि मेधा राणाही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. (Border Movie Sequel)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi