
“मी १९९७ साली ‘बॉर्डर’ केला कारण मला माझ्या वडिलांचा”; Border 2च्या सॉंग लॉंचवेळी सनी देओल झाला भावूक
बॉलिवूडमध्ये बरेच देशभक्तीपर चित्रपट आजवर आले, पण ‘बॉर्डर’ (Border) चित्रपट प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. १९९७ मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ तब्बल २९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत… जितका हा चित्रपट नॉस्टेलॅजिक आहे तितकीच या चित्रपटातील गाणी देखील आहेत… अशातच ‘घर कब आगोगे’ हे गाणं रिलीज झालं असून या सॉंग लॉंचवेळी सनी देओल भावूक झाला… (Border 2 Movie Song Launch)

बॉर्डर २ चित्रपटातील सोनू निगमच्या आवाजातील ‘संदेसे आते है’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं… जैसलमेरमध्ये लौंगेवाला बॉर्डरवर भव्य इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी ‘बॉर्डर २’चं ‘घर कब आओगे’ गाणं रिलीज करण्यात आलं. यावेळी सनी देओल भावुक झाला होता. बीएसएफ सैनिकांच्या उपस्थितीत गाण्याच्या लाँचवेळी सनी देओलला अश्रू अनावर झाले होते.

यावेळी सनी देओल म्हणाला की, “जेव्हापासून मी ‘बॉर्डर’ चित्रपट केला तेव्हापासून मी तुमच्याच कुटुंबाचा भाग आहे. मी १९९७ साली ‘बॉर्डर’ केला कारण मला माझ्या वडिलांचा ‘हकिकत’ सिनेमा खूप आवडला होता. त्यावेळी मी लहान होतो पण जेव्हा मी अभिनेता झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की मी सुद्धा माझ्या वडिलांलारखाच सिनेमा करेन.” (Sunny Deol Movies)
सनी पुढे म्हणाला, “मी जे.पी दत्ता साहेबांशी बोललो आणि आम्ही दोघांनी या विषयावर सिनेमा ब)नवायचं ठरवलं. सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. मी आणखी जास्त बोलू शकत नाही, मेरा दिमाग हिला हुआ है.” सनी देओल वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या आठवणीत भावुक झाला होता. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : एका गैरसमजामुळे भांडण; Shah Rukh Khan आणि Sunny Deol मध्ये ३० वर्ष होता अबोला!
================================
दरम्यान, ‘बॉर्डर २’ हा चित्रपट देशभरात २३ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे. अनुराग सिंह यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मोना सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे प्रत्येक देशप्रेमी आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत शंकाच नाही….(Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi