Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

एका गैरसमजामुळे भांडण; Shah Rukh Khan आणि Sunny Deol मध्ये ३० वर्ष होता अबोला!
फिल्मी दुनियेत फक्त हिरोईन्समध्येच कॅट फाईट्स नसतात तर काही अभिनेत्यांमध्येही भांडणं किंवा कुरघोडी होतात… काही अभिनेते आपला स्टारडम कमी होतोय किंवा आपल्यापुढे कोणता हिरो जातोय यामुळे इन्सिक्युअर होतात… आज आपण अशा दोन हिरोंच्या भांडणाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांच्यात १९९३ मध्ये एका गैरसमजामुळे वैर निर्माण झालं होतं… ते २ हिरो आहेत शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सनी देओल (Sunny Deol) आणि चित्रपट होता ‘डर’… नेमकं काय झालं होतं जाणून घेऊयात…

तर, १९९३ मध्ये ‘डर’ हा चित्रपट रिलीज झाला होता आणि तोवर सनी देओलला इंडस्ट्रीत येऊन १० वर्ष पुर्ण झाली होती… डर चित्रपट येईपर्यंत सनी देओलने ‘बेताब’पासून ‘घायल’, ‘त्रिदेव’, ‘दामिनी’, ‘नरसिंह’ आणि ‘विश्वात्मा’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांवर आपलं नाव कोरलं होतं… आणि शाहरुखने वर्षभरापूर्वीच १९९२ मध्ये ‘दिवाना’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं… वर्षभरात बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकलेल्या शाहरुखच्या बाजीगर चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली… आणि मग ‘डर’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधला आणखी एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला… (Entertainment News)

‘डर’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शाहरुख खान आणि सनी देओल एकत्र झळकले होते… या चित्रपटानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही… परंतु ‘गदर २’ (Gadar 2) चित्रपटच्या सक्सेस पार्टीत पुन्हा शाहरुख आणि सनी देओल एकत्र दिसल्यानंतर सनीने ३० वर्ष त्याच्या आणि किंग खानच्या अबोलयुद्धाला विराम लागल्याचं समजलं… (Shah Rukh Khan & Sunny Deol controversy)
‘डर’ चित्रपटात सनी देओलला असं वाटलं की आपली भूमिका साईडलाईन झाली आहे आणि शाहरुखला जास्त फुटेज दिल्याचा आरोप सनीने मेकर्सवर केला होता… ज्यावेळी सनीने चित्रपट साईन केला तेव्हा त्याची सेकंड लीड भूमिका आहे हे सांगितलं गेलं नव्हतं आणि आपल्यामागून आलेल्या शाहरुखला लीड रोल मिळाल्यामुळे सनी नाराज झाला होता आणि यावरुन बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली होती… यानंतर सनी देओल आणि शाहरुख कधीच एकमेकांशी बोलले नाहीत; शिवाय सनीने यश चोप्रांसोबतही नंतर परत काम केलं नाही. (Yash Chopra Movies)

दरम्यान, ‘डर’ चित्रपटाच्या यशाबद्दल बोलायचं झालं तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि यश चोप्रा दिग्दर्शित हा सायकॉलॉजिकल-थ्रिलर १९९३ मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. इतकंच नाही तर, ‘डर’ ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (सनी देओल), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (जुही चावला), सर्वोत्कृष्ट खलनायक ( शाहरुख खान ) व्यतिरिक्त, फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (अनुपम खेर) आणि सर्वोत्कृष्ट छायांकन अशी पारितोषिकं चित्रपटाला मिळाली होती…
अलीकडेच, न्यूज18 शी बोलताना सनी म्हणाले, ‘मी शाहरुखसोबत ‘डर’ मध्ये काम केले आहे, त्यामुळे मला त्याच्यासोबत दुसरा चित्रपट करण्यास काहीच हरकत नाही. पुढे त्यांच्यातील वादाबद्दल विचारलं असता सनी म्हणाला होता की, “भांडणं होतच राहतात, मग लोकं ती मिटवतात सुद्धा.’ मला त्याचा त्रास झाला नाही. जे काही झाले, ते होऊन गेले, तो काळ निघून गेला. त्यानंतर, सर्वांना कळले की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे, म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही. नाहीतर, आपण पुढे कसे जाणार?’
================================
हे देखील वाचा : Kamal Haasan Birthday : असा अभिनेता पुन्हा होणे नाही!
================================
दरम्यान, सनी देओल याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ‘बॉर्डर २’ (Border 2) आणि ‘गदर ३’ (Gadar 3) या चित्रपचात तो मुख् भूमिकेत दिसणार आहे… तसेच, शाहरुख खान ‘किंग’ (King Movie) चित्रपटात झळकणार असून यात सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पादूकोण आणी बरेच कलाकार यात दिसणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi