सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ची घोषणा; 27 वर्षापूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मेजर कुलदीप येणार
‘गदर २’पासून सनी देओलच्या गाजलेला सिनेमा ‘बॉर्डर’चा दुसरा भागही चर्चेत होता. पण आता अखेर सनी देओलसोबत निर्मात्यांनी ‘बॉर्डर २’ची अधिकृत घोषणा केली आहे. बहुप्रतीक्षित गाजलेला सिनेमा ‘बॉर्डर’च्या दुसऱ्या पार्टीच्या घोषणेमुळे चाहत्यांची उत्कंठा आता गगनात मावेनासी झाली आहे. सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बॉर्डर 2’ची पहिली क्लिप उघड केली आहे, ज्यामध्ये अभिनेता आपल्या दमदार आवाजात 27 वर्षांचे वचन पूर्ण करण्याबद्दल बोलताना ऐकायला मिळत आहे.(Border 2 Announcement)
सनी देओलने नुकताच त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल दिसत नाही, बॅकग्राऊंडमध्ये फक्त सनी देओलचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये सनी म्हणताना ऐकायला येत आहे की,- ’27 वर्षांपूर्वी एका सैनिकाने वचन दिले होते की तो परत येईल. हेच वचन पूर्ण करण्यासाठी, भारताच्या मातीला सलाम करण्यासाठी… येत आहे… पुन्हा…!’ मग बॅकग्राऊंडमध्ये ‘संदेश आती हैं…’ हे प्रचंड लोकप्रिय असलेले बॉर्डर सिनेमातील गाणं ऐकू येत आहे. सनी देओलने ‘बॉर्डर २’चा अनाउंसमेंट व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 27 वर्षांचं वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक जवान येत आहे… भारताचा सर्वात मोठा युद्धपट ‘बॉर्डर २’.
=============================
=============================
सनी देओलचा प्रचंड लोकप्रिय असलेला आणि क्लासिक बॉर्डर हा चित्रपट 1997 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला होता. त्यावेळी या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने जास्त बिझनेस केला होता. त्यावेळी बॉर्डरची निर्मिती जेपी दत्ता यांनी केली होती. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता आता कल्ट क्लासिक बॉर्डरच्या भाग २ ची निर्मिती करत आहेत. तर अनुराग सिंगने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. आता अनाउंसमेंट व्हिडिओ शेअर केल्यानंतर प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल अधिक जाणून घ्यायाची इच्छा झाली आहे.