
Varun Dhawan-Janhvi Kapoor यांच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा ट्रेलर रिलीज
एकीकडे बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, ऐतिहासिक, हॉरर कॉमेडी चित्रपटांचा एकमागून एक सपाटा सुरुच आहे… अशात आता कॉमेडी ड्रामा असलेला ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’(Varun Dhawan-Janhvi Kapoor) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या जोडीने धुमाकूळ घातला आहे… विविधांगी भूमिका साकारल्यानंतर पुन्हा एकदा वरुन कॉमेडी भूमिकेत दिसणार आहे…जान्हवीसोबतची त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवजत असून आता त्यांच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे…

बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटानंतर वरुण पुन्हा एकदा कॉमेडी अवतारात दिसणार आहे.. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्पष्ट होतंय की वरुण धवन सनी आणि जान्हवी तुलसीच्या भूमिकेत आहे. तर सान्या मल्होत्रा अनन्या आणि रोहित सराफ विक्रम आहे. सनीला अनन्या आणि तुलसीला विक्रम आवडत असतो. मात्र, अचानक विक्रम आणि अनन्याच एकमेकांच्या प्रेमात पडतात. यामुळे सनी आणि तुलसीला ईर्ष्या वाटू लागते. आपापल्या पार्टनर्सला जळवण्यासाठी ते एकत्र येण्याचं नाटक करतात. आत सनी आणि तुलसीच प्रेम कसं फुलणार हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे..
================================
=================================
चौघांच्या गुंतागुंतीचं प्रेम प्रकरण पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत.. २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात जान्हवी कपूर, वरुण धवन, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत… तर, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स अंतर्गत सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे… तसेच, या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ ही रिलीज होणार आहे.. आता बाजी कोण मारणार हे पाहायलाच हवं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi