Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

डायलॉग रिपीट होत आहेत हिट…

 डायलॉग रिपीट होत आहेत हिट…
टीव्ही वाले मिक्स मसाला

डायलॉग रिपीट होत आहेत हिट…

by Kalakruti Bureau 22/04/2021

तुमच्यासाठी कायपण असं बोलणारा प्रियकर एखाद्या प्रेयसीला भेटला आणि चालतयं की असं आपल्या बायकोच्या वाक्यावर म्हणणारा नवरा भेटला तर वावगं वाटायला नको कारण हे सुपरहिट डायलॉग आपल्या मालिकांमधील नायकांच्या तोंडून वारंवार आपण ऐकलेले आहेत. असे अजून काही डायलॉग वारंवार मालिकेत वापरले जातात कि ते डायलॉगच त्या पात्राची ओळख होते. कधी हे डायलॉग मालिकेचा युएसपी होतात. अशाच काही सध्याच्या रिपीट होणाऱ्या सुपरहिट डायलॉग वर एक नजर टाकूया.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील शालिनी सतत आपलं म्हणणं बरोबर आहे हे समोरच्याकडून वदवून घेण्यासाठी ‘व्हय म्हणा की’ असं म्हणते. ‘गे बाय माझे’ असं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विमल सतत म्हणताना दिसते. ‘समद्याची खरकटी उचलायला मी एकटी’ असं फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील जीजी आक्का रागात सगळ्यांना म्हणताना दिसतात.

‘ब्युटीफूल’ असं ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या रागाच्या किंवा आनंदाच्या सगळयाच प्रसंगात एका विशिष्ट लयीत म्हणते. ‘बोललो तर बोललो’ असं ‘कारभारी लयभारी’ मधील वीरू आपलं बोलण म्हणजे वचनच अशा अर्थाने बोलताना दिसतो. याच मालिकेतील काकीचं ‘डोक्यात फिट करून ठेवा’ हे वाक्यही खूप फेमस आहे. ‘मी ऑफिसच्या वेळात ऑफीसचीच काम करते’ असं ‘पाहिले न मी तुला’ मधील मनू समरला म्हणताना दिसते. ‘जावा तिकडं’ अस ‘राजा राणीची गं जोडी’ मधील संजू प्रेमाने आपल्या नवरयाला नेहमी म्हणते. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मधील अंजीची आई  ‘ढवळून टाकीन’ हे वाक्य हाताची एक विशिष्ट हालचाल करून स्टाईलने सतत म्हणते.

 Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

‘देवमाणूस’ सिरीअल बघताना जरा धडकी भरली तरी त्यातील वाक्य एकदम भारी आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर ‘एक गोळी कायमचा आराम’ हे डॉक्टर अजितचं वाक्य ऐकलं की एकदम भीतीच वाटते. ‘डिंपलला सिंपल राहायला आवडत नाही’ हे वाक्य तर तरूणाई मध्ये खूप हिट आहे. ‘सरू आजीच्या म्हणी’ हे सरू आजीचं वाक्य ऐकायला छान वाटतं. ‘माझा होशील ना’मधील समशेर सिंग आणि लाज्जोचे परत परत येणारे डायलॉग ऐकायला तितकीच मज्जा येते. ‘इसरलंय’ हा ‘रात्रीस खेळ चाले’ मधील पांडूचा डायलॉग तर डोक्यात इतका फिट होतोय की काही विचारूच नका.

एखादे शब्द किंवा वाक्य मालिकेत सुरूवातीला एखादं पात्र उभं करण्यासाठी वापरतात पण कालांतराने ते वाक्य कथानकात इतकं फेमस होतं की मालिका त्या डायलॉगमुळे ओळखली जाते. मग मालिकेत ते पात्र बोलण्याआधीच प्रेक्षक पाहताना तो डायलॉग आधीच किंवा बरोबरीने म्हणतात किंवा रोजच्या संवादात आपसूक एखाद्या प्रसंगी हा मालिकेतील डायलॉग ओठांवर येतो. अशाप्रकारे आता मालिकेतील कॅरॅक्टरचे डायलॉग लोकांच्या पसंतीस उतरवण्यास कलाकार आणि लेखक यशस्वी ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

  • सिध्दी सुभाष कदम. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment marathi marathi Show Marathi television Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.