‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभ आणि शशी कपूरची सुपरहिट जोडी
सत्तरच्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी अगदी पीक पॉईंटवर होती त्यावेळी एका पत्रकाराने मुद्दाम खवचटपणे जया भादुरीला एक प्रश्न विचारला होता “सध्या अमिताभ बच्चन यांची जोडी कुणासोबत सुपरहिट होते आहे असे तुम्हाला वाटते? त्यावर जया भादुरीने अतिशय मार्मिक आणि चपखल उत्तर दिले होते. ती म्हणाली, ”सध्या अमिताभ बच्चन यांची जोडी शशी कपूर (shahi kapoor) सोबत सुपरहिट होत आहे!” त्या पत्रकाराचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल.
असो, पण खरोखरच अमिताभ बच्चन आणि शशी कपूर (shahi kapoor) यांची जोडी त्या काळातली सुपर डुपर हिट सिनेमे देणारी जोडी ठरली होती. या दोघांनी तब्बल बारा चित्रपट केले. शशी कपूर यांच्या ‘बॉम्बे टॉकीज’(१९७०) या चित्रपटात अमिताभ बच्चन अक्षरशः एक्स्ट्रा म्हणून काम करत होता पण शशी कपूरने (shahi kapoor) त्याची भूमिका कापून टाकली आणि एक्स्ट्राच्या रांगेत जात असणाऱ्या अमिताभच्या करिअरला मोठा हातभार लावला. त्यानंतर अमिताभचा ‘जंजीर’ चित्रपट सुपरहिट झाला आणि तो सुपरस्टार पदाकडे जाऊ लागला. या काळात १९७४ साली मनोज कुमार यांच्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा एकत्र आले. खरं तर हा सिनेमा साईन केला तेव्हा अमिताभ लोकप्रिय नव्हता यातील भूमिका देखील फारशी मोठी नव्हती. पण या दोघांची जोडी इथून खऱ्या अर्थाने जमली.
यानंतर यश चोप्रा यांच्या ‘दिवार’(१९७५) या चित्रपटात दोघे एकत्र आले. यात अमिताभ आपल्या रंगवलेला विजय वर्मा आणि शशी कपूर (shahi kapoor) रंगवलेला पोलीस इन्स्पेक्टर रवी वर्मा अतिशय जबरदस्त होते. यात शशी कपूरचा फेमस डायलॉग होता ‘मेरे पास माँ है….’ यानंतर यश चोप्रांच्याच ‘कभी कभी’ (१९७६) या चित्रपटात हे दोघे एकत्र होते. या सिनेमाचे कथानक खूप ट्विस्ट असलेले होते. अमिताभची प्रेयसी राखीचे लग्न शशी कपूर सोबत होते. यानंतर यश चोप्रांच्याच तिसऱ्या चित्रपटात हे पुन्हा एकत्र आले चित्रपट होता १९७८ साली प्रदर्शित झालेला ‘त्रिशूल’. यात अमिताभचा डॅशिंग विजय आणि शशी कपूरचा बिझनेसमन रवी. या दोन कुटुंबातील संघर्ष. अमिताभचा अँग्री यंग मॅन आणि शशी कपूरचा समजूतदार बिझनेसमन सर्वच काही जमून आले होते.
यानंतर यश चोप्रा यांच्याच ‘काला पत्थर’ या १९७९ सालच्या चित्रपटात हे दोघे एकत्र आले. यात अमिताभ बच्चन याने रंगवलेला विजय काहीसा गंभीर होता तर माईन इंजिनियर रवी जबरदस्त होता. यानंतर यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ या १९८१ साली प्रदर्शित झालेले चित्रपटात हे दोघे एकत्र आले होते. या चित्रपटात पहिल्यांदाच शशी कपूर ने अमिताभ बच्चन मोठ्या भावाची भूमिका केली होती. वास्तविक जीवनात देखील शशी कपूर (shahi kapoor) हा अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा सहा वर्षांनी मोठा होता. या व्यतिरिक्त रमेश सिप्पी यांच्या ‘शान’, राकेश कुमार यांच्या ‘दो और दो पांच’ आणि देश मुखर्जी यांच्या ‘इमान धरम’ या चित्रपटात देखील हे दोघे एकत्र होते. तसेच मनमोहन देसाई यांच्या ‘सुहाग’ आणि प्रकाश मेहरा यांच्या ‘नमक हलाल’ या सुपरहिट चित्रपटात देखील हे दोघे एकत्र आले होते. रमेश सिप्पी यांच्या १९९० साली आलेल्या ‘अकेला’ या चित्रपटात शेवटी हे दोघेजण एकत्र आले. यानंतर शशी कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अजूबा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती.
========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन आणि ‘शावा शावा’ डान्स!
========
अमिताभ सोबत शशी कपूर (shahi kapoor) हे कॉम्बिनेशन त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले होते हे दोघे एकत्र चित्रपटात असणे म्हणजे सिनेमा हमखास यशस्वी होण्याची गॅरंटी होती. असे म्हणतात त्याकाळी अमिताभ बच्चन कुठल्या निर्मात्याला भेटायला जात असताना एका ब्लॅक पेपरवर शशी कपूरची सही घेऊन जात असे. जेव्हा निर्माता दोन हिरो असलेले कथानक सांगत असे आणि ते जर कथानक अमिताभला आवडले तर तो लगेच शशी कपूरचा सही केलेला कागद पुढे करून त्याच्या वतीने सिनेमा साइन करत असे!