
Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…
मराठी चित्रपटसृष्टीतील सोबर आणि साधी अभिनेैत्री या कॅटेगरीतील अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgoankar)… माहेरचं नाव सुप्रिया सबनीस आणि ‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटानंतर झालेल्या सुप्रिया सचिन पिळगांवकर… लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुप्रिया यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका, चित्रपट अशी सर्वच माध्यमं गाजवली आहेत… आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा प्रवास…

सुप्रिया पिळगांवकर यांनी मधुर तोरडमल यांच्या ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ या व्यावसायिक नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला… त्यावेळी त्या दुरदर्शनवरील ‘किलबिल’ या लहान मुलांच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका साकारत होत्याच… बरं त्यावेळी झालं असं की म्हातारीची भूमिका साकारुनही सचिन पिळगांवकर यांच्या आईला ही तरुण म्हातारी नजरेत भरली… त्याच दरम्यान सचिन पिळगांवकर त्यांच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटासाठी नायिका शोधत होते.. आणि चक्क सचिन यांच्या आईने सुप्रिया यांचा त्या भूमिकेसाठी विचार केला जावा अशी शिफारस केली..

खरं तर सुप्रिया यांच्या पालकांचा चित्रपटात त्यांनी काम करण्याला विरोध होता; परंतु, नंतर आई-वडिलांचंया संमतीनीचे त्यांनी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि पर्यायाने सनिच पिळगांवकर यांच्या जीवनाती एन्ट्री केली…सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या… मात्र, रिमा लागू यांच्यासोबतची ‘तु तु मैं मैं’ ही त्यांनी विनोदी मालिका विशेष लोकप्रिय झाली… सुप्रिया यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिका विश्वातही आपलं स्थान निर्माण केलं… ‘दिवाने हुए पागल’, ‘बरसात’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘ऐतबार’, ‘हिचकी’, ‘रश्मी रॉकेट’, ‘तुझे मेरी कसम’ अशा बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्या झळकल्या… आता वळूयात जरा त्यांच्या सनबीस ते पिळगांवकर या प्रवासाकडे…(Bollywood News)

तर, एका मुलाखतीत सुप्रिया पिळगांवकर यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी शेअर करताना म्हटलं की, “सबनीसांची पिळगांवकर होतानाचा तो दिवस मला चांगलाच आठवतो. कारण सगळं झाल्यानंतर मला जेव्हा जाणीव झाली की आता आईबाबांना सोडून जायचं आहे. तो दिवस खूप कठिण होता माझ्यासाठी, खूप रडले होते मी तेव्हा. तो दिवस खूपच भयंकर होता, कारण काय करतोय, कुठे जातोय असं सगळंच मला आठवत होतं. कारण माझं वय अगदीच हे १८ वर्ष वैगरे होतं. त्यावर सचिन पिळगांवकरांनी म्हटलं की, “तिच्या आईवडिलांपेक्षा जास्त दिवस तिने माझ्यासोबत काढली आहेत”.

पुढे सचिन म्हणाले की,“ती मला पहिल्यांदाच आवडली होती. पण हिच्याशीच आपण लग्न करायला हवं, हे मी तिच्या आईवडिलांना भेटून ठरवलं. कारण त्या दोघांनी तिच्यावर केलेले संस्कार, ते दोघेही किती सुसंकृत आहेत, हे मला त्यांना भेटल्यानंतर कळलं. मला माझ्या आयुष्यातली जोडीदार ही अतिशय संस्कारी हवी होती. मी आधीपासूनच ठरवलं होतं की, मी मराठी मुलीशीच लग्न करणार. त्यामध्ये अरेंज मॅरेज करायचं नाही आणि मराठी मुलीशीच लग्न करायचं या दोन गोष्टींवर मी ठाम होतो”.
================================
हे देखील वाचा : Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…
=================================
दरम्यान, सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी एकत्रित बरेच चित्रपट केले… ‘नवरा माझा नवसाचा’ हा त्यांचा गाजलेला आणि प्रेक्षकांना आवडलेला अलीकडचा चित्रपट… आता पुन्हा एकदा सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, निववेदिता सराफ ही मातब्बर मंडळी एखाद्या तरी चित्रपटातून एकत्र यावी ही प्रत्येक मराठी प्रेक्षकांची अपेक्षा असेल यात शंकाच नाही…(Marathi Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi