Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Suraj Chavan : भरत जाधव आणि सूरज चव्हाण यांची ग्रेट भेट
सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचा टिक टॉक स्टार ते चित्रपटात हिरो असा प्रवास एका कार्यक्रमामुळे शक्य झाला तो म्हणजे मराठी बिग बॉस. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने होस्ट केलेल्या मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता होता सूरज चव्हाण. लवकरच तो केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात दिसणार आहे. सगळीकडे सूरजच्या चित्रपटाचीच चर्चा सूरु आहे. नुकतीच त्याने अभिनेते भरत जाधव यांची भेट घेतली असून या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर सध्या व्हायरल झाले आहेत.
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नुकतंच चित्रिकरण पुर्ण झाल्याची पोस्ट त्याने सोशल मिडीयावर काही दिवसांपूर्वी केली होती. आणि आता त्याने भरत जाधव (Bharat Jadhav) यांची भेट घेत फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. सूरजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भरत यांना मिठी मारत त्यांच्या पाया पडताना दिसला.

सूरजने (Suraj Chavan) व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “भरत जाधव सर मला लय आवडतात….त्यांचे चित्रपट बघून खूप हसायला येतं. काल त्यांची भेट झाली. सर खूप खूप भारी आहेत. त्यांनी मला आपल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप प्रेमाने वेळ दिला…भरत सर खूप खूप आभार” (Zhapuk Zhupuk movie)
===========================
हे देखील वाचा: Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
===========================
दरम्यान, ‘झापुकू झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह (Suraj Chavan) ‘पिरतीचा उनवा उरी पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. आता बिग बॉसमध्ये टास्क खेळणारा सूरज अभिनय कसा करतो हे पाहण्यासाठी नक्कीच सगळेच उत्सुक आहेत.(Marathi big boss)