
Suraj Chavan :‘झापुक झुपूक’चं चित्रीकरण पूर्ण; लवकरच चित्रपट येणार भेटीला
मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शो दरम्यान लवकरच तुझ्यासोबत चित्रपट करेन असं वचन दिलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे सूरज सोबत त्यांनी ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची घोषणाही केली होती. आता नुकतंच या चित्रपटाच्या चित्रिकरणाचं काम पूर्ण झालं असून एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. केदार शिंदेंनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Suraj Chavan)
केदार शिंदे व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, “बाप्पाच्या आशीर्वादाने सूरज चव्हाणच्या म्हणजेच ‘झापुक झुपूक’ या धमाल चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं. एका बुक्कीत टेंगूळचं…तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असून दे…२५ एप्रिलपासून भेटूया आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” (Big Boss Marathi Season 5)

तसेच, सूरज चव्हाणनेही मरीमातेकडे प्रार्थना करतानाचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, “मित्रांनो आपल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं…तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्याबरोबर असुद्या…आई मरी माता, ॐ नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया.” (Suraj Chavan)
========
हे देखील वाचा : ‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण आहे तरी कोण?
=========
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाण, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत आणि दीपाली पानसरे हे नव्या दमाचे चेहरे झळकणार आहेत. आता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. (Marathi film)