Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Suraj Chavan : गुलीगत सूरजच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा टिझर रिलीज!
‘बिग बॉस मराठी सिझन ५’ (Big Boss Marathi Season 5) च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याच्या या दमदार चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. (Suraj Chavan)
‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या टिझरमध्ये सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल त्याचा अभिनय आणि त्याचे डायलॉग्स लक्ष वेधतात. अत्यंत गरीबीतून स्वकष्टाने प्रसिद्धी मिळवणाऱ्या सूरज चव्हाणचं जीवनच काहीसं या चित्रपटात दाखवलं आहे असं काही दृश्यांमधून दिसतं. (Big Boss Marathi season 5)

‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
==========
हे देखील वाचा :Bharat Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतला ‘श्रीमंत’ कलाकार!
==========
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. (Marathi upcoming film)