
Suraj Chavan : आता होणार फुल टू राडा…; ‘झापुक झुपूक’चा ट्रेलर रिलीज!
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. आणि रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचा सूरज चव्हाण खूप मोठा चाहता आहे आणि बिग बॉस सीजन ५ च्या यशानंतर रितेश सूरजच्या या खास क्षणी सामील झाला आहे. (Kedar shinde)
सूरज चव्हाण अभिनित ‘झापुक झुपूक’ या सिनेमाचं ट्रेलर आनंदाची मेजवानी घेऊन आलाय. रोमांस, ऍक्शन , ड्रामा या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. हा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या सिनेमाची क्रेज जास्त पहायला मिळते. सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमकेदार डायलॉग्स अख्ख्या महाराष्ट्रात आता गाजणार आहे. (Marathi upcoming films 2025)

रितेश देशमुख म्हणाला की, “बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरज साठी तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बॉग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हंटलं होतं कि विजेता कोण पण असू दे मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. असं नाही आहे कि सूरज जिंकल्यावर सिनेमा बनवण्यात आलाय. त्यामुळे केदार भाऊंच्या हिम्मत आणि कंमिटमेंटला माझा सलाम आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे यात मला काहीच शंका नाही. मला सूरजचा खूप अभिमान आहे”. (Ritesh Deshmukh)
===========
हे देखील वाचा : ‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमावेळी किशोर कुमार का चिडला होता ?
===========
‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज (Suraj Chavan) सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण प्रेक्षकांना २५ एप्रिल पासून पाहायला मिळणार आहे. (Zhapuk Zhupuk movie)