
Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!
मराठी बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची चर्चा होतीच आणि आता चित्रपटात कोणते कलाकार असणार ते समोर आलं आहे.. (Suraj Chavan)

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. (Kedar Shinde movies)
===========================
हे देखील वाचा:अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
===========================
फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या ‘झापुक झुपूक’ च्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. (Bollywood news update)

पोस्टरमध्ये सूरज बैलगाडी ओढत आहे तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे उत्तम युवा अभिनेत्यांमुळे हा चित्रपट नक्कीच सध्याची युवा पिढी आणि सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट २५ एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे.(Entertainment update)