‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Suraj Chavan ची लग्न पत्रिका सोशल मिडियावर व्हायरल; पाहा कुठे आणि कधी होणार सर्व विधी…
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) आपल्या प्रेमिका संजनासोबत लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. सुरजच्या आगामी लग्नासंबंधी सर्वत्र चर्चा सुरु असून आता त्याची आणि संजनाची लग्नाची तारीख आणि इतर सणांच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकरने (Ankita Walavalkar) सुरज आणि संजनासाठी विशेष केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात संजनाची पहिली झलक पाहायला मिळाली आणि सुरज आणि संजनाने एकमेकांसाठी खास उखाणे घेतले. (Suraj Chavan Wedding Invitation)

सुरजने “बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, सजनाचं नाव घेतो बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न” असा उखाणा घेतला, तर संजनाने “बिग बॉसचा व्हिनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको” असं चांगलं उखाणं घेतलं. सुरज आणि संजनाची हळद आणि लग्न एकाच दिवशी होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेच्या मते, साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ त्या च दिवशी दुपारी 2 वाजता आणि लग्न समारंभ संध्याकाळी 6.11 वाजता पुण्यातील माऊली गार्डन हॉल येथे धुमधडाक्यात होणार आहे.

“बिग बॉस” मध्ये असताना सुरजने त्याच्या स्वप्नातील घराची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते, जे त्यांनी पूर्ण केले. सुरजने आपल्या कुटुंबीयांसोबत नवीन घरात गृहप्रवेश केला असून, या आलिशान घराची झलक त्याने चाहत्यांना दाखवली.(Suraj Chavan Wedding Invitation)
===============================
===============================
सुरज आणि संजनाच्या लग्नाची उत्सुकता सर्वत्र आहे. बिग बॉसच्या घरात सुरजने आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल खुलासा केला होता, आणि आता तो आणि संजनाच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. त्यांच्या आगामी विवाहसोहळ्याची सर्वांगीण तयारी चालू आहे आणि त्याची उत्सुकता एकाच दिवशी साजऱ्या होणाऱ्या या खास समारंभाच्या निमित्ताने वाढली आहे.