
Surekha Kudchi : एका रात्रीचे किती घेणार?, कास्टिंग काऊचचा भयावह अनुभव
‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ हे वाक्य आपण बऱ्याचवेळा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये ऐकतो… फिल्म इंडस्ट्रीत मात्र या वाक्याचा अर्थ फारच वेगळा आणि चुकीचा आहे… अभिनय क्षेत्रात काहीतरी करू पाहणाऱ्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून घरच्यांचा विरोध पत्करून शहरात अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या अनेक मुलींकडे चित्रपटात तुला काम देतो असं सांगून चुकीच्या मागण्या केल्या जातात… असाच कास्टिंग काऊचचा एक भयानक किस्सा अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एका मुलाखतीत सांगितला होता… काय होता तो वाचा… (Surekha kudchi)
अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांच्यासोबत रंगलेल्या एका मुलाखतीत सुरेखा यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला…. सुरेखा म्हणाल्या की, “आदर्श नगरला मला एकाने सांगितलं की एका हिंदी चित्रपटासाठी ऑडिशन सुरू आहे तर तू जा तिथे… ही घटना आहे ९०ची..तर हिंदीत काम करायला मिळणार त्यामुळे मी खूप एक्साईट झाले होते… त्या ऑफिसमध्ये मी आईला घेऊन गेले, आई बाहेर बसली होती मी आत केबिनमध्ये त्या माणसाला भेटायला गेले… आत केबिनमध्ये शिरल्यावर मी भिंतींवर हॉरर चित्रपटांचे पोस्टर्स पाहिले.. त्यावेळी सी ग्रेडचे चित्रपट असतात असही मला माहित नव्हतं… तर तिथे लागलेल्या हॉरर चित्रपटांच्या पोस्टर्समध्ये मोहन जोशी किंवा दीपक शिर्के यांचे फोटो दिसले आणि मला वाटलं की हा म्हणजे माझ्यासमोर बसलेला माणूस निर्माता आहे…” (Casting couch experience)

पुढे त्या म्हणाल्या, “मग मला त्या माणसाने चित्रपटाची कथा ऐकवली आणि म्हणाला की या चित्रपटाच्या लीड रोलसाठी तुमची निवड करत आहोत… आणि हे ऐकून मला आनंद झाला आणि मी त्यांना थँक यू म्हणाले.. त्यावर तो व्यक्ती मला म्हणाला की आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटात लीड रोल देतोय तर त्याबदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार? मला काहीच समजत नव्हतं की त्यांचा बोलण्याचा रोख कोणत्या दिशेला होता…. ते ऐकून मला असं वाटलं की अरे मी आता यांना पैसे देऊन काम करायचं आहे का? हे माझ्यात मनात सुरू होतं.. मी त्यांना बोलले माझ्याकडे पैसे नाही आहेत मी फक्त चांगलं काम करेन.. तुम्ही मला पैसे दिले नाहीत तरी मला चालेल पण हिंदीत काम मिळतंय हे माझ्यासाठी खूप आहे…” (Entertainment update news)

“माझ्या या बोलण्यावरून त्याला समजलं की तो काय मागतोय हे मला कळतच नाहीये.. शेवटी त्याने स्पष्ट शब्दात मला विचारलं की एका रात्रीचे किती घेणार? त्यावर मला असं वाटलं की शूटिंगला जर नाईट शिफ्ट असेल तर त्याचे पैसे किती होतील? जे मी इतर कलाकारांकडून ऐकलं होतं की नाईट शिफ्ट असेल तर त्याचे वेगळे पैसे असतात.. मी म्हणाले तुम्ही द्याल ते.. यावरून त्या माणसाला खात्री पटली की मला काहीच कळत नाही आहे.. त्यानंतर त्याने आणखी स्पष्ट शब्दात माझ्याकडे मागणी केली.. ते ऐकून मला धक्का बसला आणि मी हात जोडून त्या केबिनमधून बाहेर आले…”, असा भयावह अनुभव सुरेखा यांनी सांगितला… (Entertainment news)
हिंदीच नव्हे तर इतर अनेक भाषिक चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव आतापर्यंत आला आहे.. काही जणी त्याबद्दल स्पष्टपणे व्यक्त होतात तर काहीजणी भीतीपोटी काहीच न बोलता सहन करत राहतात…(Bollywood gossip)
==================================
हे देखील वाचा: Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन
==================================
सुरेखा कुडची यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनयासोबत त्या उत्तम नृत्यांगना देखील आहेत… लावणीच्या माध्यमातून त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली होती.. त्यानंतर चित्रपटामध्ये संधी मिळाल्यानंतर जखमी कुंकू हा त्यांचा पहिला चित्रपट होता…यानंतर ‘सासूची माया, आई थोर तुझे उपकार, पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, प्रेमाय नम:, ‘पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले… (Surekha kudchi movies)

चित्रपटांसोबत त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं… ‘देवयानी’, ‘नकळत सारे घडले’, ‘तू माझा सांगाती’, या त्यांच्या गाजलेल्या मालिका… याशिवाय मराठी बिग बॉसमध्येही त्या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या…