Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’;

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची

Sanjeev Kumar : ‘एक्स्ट्रा पासून एक्स्ट्रा ऑर्डीनरीपर्यंत झेप घेणारा अभिनेता

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत;

War 2 : ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाबद्दल करण जोहर म्हणतो, “हा

Gulkand : ‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Usha Nadkarni : “एक चित्रपट केला की स्वत:ला हॉलिवूडचे समजतात”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग

 ‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग
Suryachi Pille Marathi Natak
नाट्यकला

‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग

by Team KalakrutiMedia 28/08/2024

सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम‘ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले‘ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले. याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले‘ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित प्रस्तुत या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार असून याचा पहिला मुंबईतील प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे.(Suryachi Pille Marathi Natak)

Suryachi Pille Marathi Natak
Suryachi Pille Marathi Natak

यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी… मनभर सुखावणारी… एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी! नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनिल बर्वे, नितीन भालचंद्र नाईक निर्माते आहेत. 

Suryachi Pille Marathi Natak
Suryachi Pille Marathi Natak

 या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे म्हणतात, ” १४ वर्षांपूर्वी मी एका उपक्रम अंतर्गत या नाटकाचे २५ प्रयोग सादर केले होते. त्यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, त्यांची पुन्हा हे नाटक रंगमंचावर आणण्याची मागणी, या सगळ्याचाच मान राखत आम्ही ‘सूर्याची पिल्ले‘ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहोत.”(Suryachi Pille Marathi Natak)

===========================

हे देखील वाचा: १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

===========================

”खरंतर हे नाटक कोरोनानंतर लगेच आणण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. परंतु आता सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहोत. हे नाटक जुन्या काळातील असल्याने त्याचा ठहराव जपत, मूळ संहितेसह हे नाटक समोर येणार आहे.” असे ही निर्माते सुनील बर्वे म्हणाले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anand ingale Celebrity Entertainment Marathi Natak sunil barve Suryachi Pille Marathi Natak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.