Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास

 Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास
कलाकृती विशेष

Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास

by Jyotsna Kulkarni 21/01/2025

तो आला…त्याने पाहिले…आणि जिंकून घेतले सर्व….सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ), मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याला हे वाक्य तंतोतंत जुळते. ज्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून स्थिर होण्यासाठी अनेक वर्ष निघून जातात त्याच क्षेत्रात सुशांतने अतिशय कमी काळात स्वतःला सिद्ध तर केले सोबतच टॉपच्या अभिनेत्यांमध्ये स्वतःचे स्थान देखील पक्के केले. हा असा अभिनेता होता ज्याने अभिनयात कोणताही गॉडफादर नसताना केवळ स्वतःवर विश्वास ठेवत आपली ओळख तयार केली. (Sushant Singh Rajput)

आज सुशांत सिंग राजपूत याचा वाढदिवस. तो आज हयात असता तर त्याने आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा केला असता. सुशांत सिंग राजपूत हा थंड वाऱ्याची अशी झुळूक होती जी आली आणि सगळे त्याचा आनंद घेत असताना लगेच निघून गेली. सुशांतचे आकस्मिक झालेले निधन आजही सगळ्यांसाठीच एक मोठे कोडे आहे, जे उलगडलेले नाही. नेहमीच सुशांतची आठवण या ना त्या कारणाने निघताना दिसते. आजही त्याचे फॅन्स त्याला आठवताना दिसतात. आज सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याच्या संपूर्ण कारकिर्दीवर एक नजर टाकणार आहोत. (Sushant Singh Rajput Birthday)

Sushant Singh Rajput

सुशांतच्या जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारमधील पाटणा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुशांतसिंह राजपूत हा चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. तो अभ्यासात खूपच हुशार होता. तो ११ वीत असताना फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेला होता. तेथे त्याला सुवर्णपदक देखील मिळाले होते. त्याची एक बहीण मितु सिंह राज्यस्तरीय पातळीची क्रिकेटरदेखील होती. सुशांत हा आपल्या आईच्या खूप जवळ होता. मात्र दुर्दैवाने २००२ मध्ये त्याच्या आईचे निधन झाले आणि त्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब पाटण्यावरून दिल्लीला शिफ्ट झाले. (Entertainment mix masala)

पुढे सुशांतने दिल्लीमध्ये पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याने इंजिनीयरिंगमध्ये प्रवेश घेतला. सुशांतची एआयईईईमध्ये ऑल इंडियामध्ये ७ वी रँक आली होती. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतानाच त्याला डान्स आणि अभिनयात रस निर्माण होण्यास सुरुवात झाली. अशातच सुशांतने श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला होता. याबरोबरच तो अभिनयाचे धडेही घ्यायला लागला होता. अभ्यासासोबतच सुशांत श्यामक दावरचे डान्स क्लासेस करत होता. (Ankahi Baatein)

श्यामकसोबत सुशांतने देश-विदेशात अनेक शोज केले. याबरोबरच अनेक चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर्सचेही काम केले. त्यासोबतच त्याने नादिरा बब्बरसोबत थिएटरदेखील केले. मात्र शिक्षण अर्धवटच सोडून तो ग्लॅमरच्या जगताकडे वळला. यात आपले करिअर करण्याचा विचार करू लागला. इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाला असताना त्याने अभ्यास अर्धवट सोडला आणि अभिनयात करिअर बनवण्यासाठी मुंबई गाठली. (Bollywood Masala)

Sushant Singh Rajput

सुशांतने श्यामकच्या डान्स ग्रुपसोबत ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये परफॉर्म केले होते. त्याने ऐश्वर्या राय बच्चनसोबत ज्युनिअर डान्सर म्हणून डान्स केला होता. डान्ससोबतच सुशांत बॅरी जॉनचे अभिनय वर्कशॉपमध्ये सहभागी झाला होता. अनेक थिएटर केल्यानंतर त्याला ‘किस देश में है मेरा दिल’ हा शो मिळाला. हा शो चालू असतानाच सुशांतचे निरागस हास्य बघून एकता कपूरने त्याला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य भूमिका दिली होती.

हीच ‘पवित्र रिश्ता’ मालिका त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. या मालिकेमुळे तो संपूर्ण भारतात किंबजून जगात ‘मानव’ या नावाने ओळखला जाऊ लागला. काही वर्ष या मालिकेत काम केल्यानंतर त्याला चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची इच्छा होती. अशातच त्याला अभिषेक कपूरचा ‘काय पो चे’ हा सिनेमा मिळाला. या सिनेमाने त्याला बॉलिवूडची दरवाजे उघडून दिली. त्याने चित्रपटांमध्ये यशस्वी पदार्पण केले.

Sushant Singh Rajput

यानंतर तो शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, धोनी, सोनचिड़िया, छिछोरे , ड्राईव्ह, राबता आदी चित्रपटांमध्ये काम केले होते. यातही त्याला महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिकमुळे अफाट लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा खूपच गाजला आणि ब्लॉकबस्टर ठरला. या सानमाने सुशांतचे देखील नशीब चमकवले होते. एकीकडे तो व्यावसायिक आयुष्यात यश मिळवत असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक घडामोडी घडत होत्या.

सुशांत ‘पवित्र रिश्ता’ मध्ये त्याची सहकलाकार असलेल्या अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ते बराच काळ लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. मात्र सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांचे अचानक ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपमुळे फॅन्सला देखील मोठा धक्का बसला होता. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपचे कारण समोर येऊ दिले नाही. यानंतर त्याचे नाव अभिनेत्री कृती सेननसोबत जोडले गेले. तो तेव्हा तिच्यासोबत ‘राब्ता’ चित्रपट करत होता. मात्र काही वृत्तांनुसार सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते.

मात्र दुर्दैवाने १४ जून २०२० रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली. आजही त्याचा मृत्यू कसा झाला? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्या जाण्यानंतर आजही त्याच्या मृत्यूचे कोडे कोणालाही सोडवता आले नाही. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश हादरला होता. मात्र सुशांत अतिशय हुशार आणि प्रतिभावान कलाकार होता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेय सुशांतची स्वप्ने देखील मोठी होती. सुशांतला नव्या गोष्टी शोधायला नव्या गोष्टींचा अभ्यास करायला फार आवडायचे.

Sushant Singh Rajput

सुशांतला त्याच्या आयुष्यात खूप काही मिळवायचे होते, अपूर्ण स्वप्न पूर्ण करायची होती. मात्र सर्व अर्धवटच राहिले. त्याच्याकडे एक डायरी होती. डायरीमध्ये सुशांत याने त्याचे सर्व स्वप्न लिहिली होती. स्वतःची अनेक स्वप्न पूर्ण देखील केली… पण सुशांत याची अनेक स्वप्न पूर्ण झाली नाहीत. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रगत दुर्बिणी होत्या. त्याच्याकडे असलेल्या दुर्बिणींमधून सुशांत कायम चंद्र, चांदण्यांचा अभ्यास करायचा. एवढंच नाही तर, अभिनेत्याने चंद्रावर जमीन देखील विकत घेतली होती. चंद्रावर जमीन विकत घेणारा सुशांत बॉलिवूडमधील पहिला अभिनेता होता. तो कायम आकाशात चांदण्यामध्ये रमायचा.

===============================

हे देखील वाचा: Veena Jamkar आणि Vanita Kharat झाल्या सख्ख्या शेजारी!

==============================

‘दिल बेचारा’ हा सुशांतच्या शेवटचा चित्रपट ठरला. त्याच्या निधनाच्या दीड महिन्यांनी म्हणजे २४ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज केला गेला. सुशांतने त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील कमावले होते. तो बॉलिवूडमधील महाग अभिनेत्यांपैकी एक समजला जायचा. त्याची कोट्यवधींची संपत्ती देखील होती. काही वृत्तानुसार त्याच्या निधनानंतर त्याची संपूर्ण संपत्ती दान करण्यात आली.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor background dancer Sushant Singh Rajput Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News dancer Sushant Singh Rajput Entertainment Featured movie actor Sushant Singh Rajput Sushant Singh Rajput Birth Anniversary Sushant Singh Rajput birthday Sushant Singh Rajput facts Sushant Singh Rajput journey Sushant Singh Rajput movie journey Sushant Singh Rajput news Sushant Singh Rajput story tv actor सुशांत सिंग राजपूत सुशांत सिंग राजपूत जयंती सुशांत सिंग राजपूत प्रवास सुशांत सिंग राजपूत माहिती सुशांत सिंग राजपूत वाढदिवस हुशार अभिनेता सुशांत सिंग राजपूत
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.