Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Suvat Joshi : “लोकांनी मला दिलेल्या शिव्या या…”
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava movie) हा ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने साकारलेले शंभुराजे प्रेक्षकांना भावलेच पण या चित्रपटात इतर मराठी कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आवडल्याही आणि काहींना प्रेक्षकांनी शिव्या-श्रापही दिले. त्यातीलच कान्होजींच्या भुमिकेत असणाऱ्या सुव्रत जोशी (Suvrat joshi) याला त्याच्या भूमिकेवरुन लोकांनी ट्रोल करत खडे बोलही सुनावले. याबद्दल काही गोष्टींचा सुव्रत जोशी याने एका मुलाखतीत भूमिकेबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
‘छावा’ चित्रपटात बरेच मराठी चेहरे झळकले. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी. या चित्रपटात त्याने कान्होजींची भुमिका साकारली. चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या अनेक मुलाखती झाल्या. मात्र ‘छावा’ चित्रपटाच्या कुठल्याच प्रमोशनला त्याने हजेरी लावली नाही. याचं उत्तर आता सुव्रतने दिलं आहे. Chhaava)

सुव्रत जोशी म्हणाला, ” माझ्या फॅमिलीने माझ्या मित्रांनी तसेच माझ्या काही अमराठी मित्रांनी आणि त्यांच्या फॅमिलीने ‘छावा’ चित्रपट फार प्रमाने पाहिला. त्यांनी फक्त माझ्या नाही तर सगळ्या कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं. इतकच नाही तर जगभरातून अनेक लोकांनी मला कॉल, मेसेज करत अनेक शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने मी अनेक मुलाखती दिल्या. त्यामध्ये मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘ तू चित्रपटाच्या स्क्रीनिंगला वगैरे का गेला नाहीस?’ याचं उत्तर म्हणजे मी दहा दिवस अॅमस्टरडॅमला होतो. त्याच दिवशी तिथे नाट्य महोत्सव होता आणि मी प्रमुख पाहूणा होतो.'(Entertainment news)
सुव्रत पुढे म्हणाला की,”शुभेच्छांच्या मेसेजमध्ये जवळपास ६० ते ७० मेसेज फार भयानक होते. त्यामध्ये आम्हाला तुझा खूप राग आलाय, तुझी आता चिड येतेय. आम्ही तु अशी भुमिका करशील असा कधी विचारच केला नव्हता. त्यामध्ये अनेकांनी भावनेच्या भरात मला खूप शिव्या दिल्या होत्या. पण हेच माझ्या कामाचं यश आहे. त्यामुळे मी ते फार सकारात्मकतेने घेतलं आहे”. (Bollywood gossip)
===========
हे देखील वाचा : Chhaava Movie : ‘त्या’ भूमिकेसाठी सखी म्हणते,“तुझा द्वेष करू की…”
===========
दरम्यान, ‘सारंग साठ्ये’ (Sarang Sathaye) यालाही ‘छावा’तील (Chhaava movie) त्यांच्या भूमिकेसाठी लोकांनी फारच बडबड केली होती. आपल्याच महाराजांच्या विरोधातील भूमिका कशी करु शकता? असा जाब देखील विचारला होता. पण त्यानेही मला लोकांनी शिव्या घातल्या हीच माझ्या कामाची पावती असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, सुव्रतची बायको सखी गोखले (Sakhi Gokhale) आणि सासू शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी सोशल मिडीयावर विशेष पोस्ट करत सुव्रतच्या कामाचं कौतुक देखील केलं होतं.