Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त अभिनेता सुयश टिळक याने दिला खास मेसेज.. म्हणाला ‘खरा व्हॅलेन्टाईन म्हणजे…’
व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने सोशल मीडिया प्रेमाच्या पोस्टनी भरुन गेलंय. कित्येकांनी आपल्या जोडीदारासोबतचा फोटो किंवा एखादी छानशी पोस्ट शेअर केलेली दिसतेय. आज याच व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने अभिनेता सुयश टिळक याने एक खास मेसेज शेअर केला आहे.
सुयशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला त्यानं प्रेमाबद्दल अनोखं कॅप्शनंही दिलं आहे. त्याच्या याच पोस्टबद्दल आमच्या कलाकृती मीडियाच्या टीमनं त्याला विचारलं असता, सुयश म्हणला, “खरंतर मला वाटतं कोणतंही नातं हे त्या दोघांमध्ये होणाऱ्या प्रेमळ देवाण घेवाणीवर अवलंबून असतं. दोघंही त्यांच्या नात्यावर आणि एकमेकांवर जे प्रेम करतात ते कोणत्याही एका दिवसाचं किंवा एका विशिष्ट क्षणापुरतं मर्यादीत नसावं, तर ते आयुष्यभर साजरं करता येईल, असं असायला हवं. खरा व्हॅलेन्टाईन म्हणजे लग्नाच्या वेळी विधी सुरु असताना गुरुजी लग्नाच्या सोहळ्याचं जे महत्व सांगतात ते लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे कोणताही एक दिवस नाही, तर संपूर्ण आयुष्य एकमेकांवर मनसोक्त प्रेम करायला हवं.”
आयुषी आणि सुयश कामाच्या वेगवेगळ्या लोकेशन्समुळे व्हॅलेन्टीन्स डे एकत्र साजरा करु शकत नाहीयेत. पण सुयशच्या मते, “आजच्या दिवशी जरी एकत्र नसलो तरी प्रेमाच्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी येणारा प्रत्येक दिवस आणि संपूर्ण आयुष्य आहे. कोणत्याही एका दिवशी प्रेम साजरं करण्यापेक्षा आयुष्यभर एकमेकांना जपा आणि एकमेकांवर भरभरुन प्रेम करा.”

गेल्यावर्षी २१ ऑक्टोबरला सुयश टिळकचं आयुषी भावेसोबत लग्न झालं. सुयश आणि आयुषीची भेट एका कार्यक्रमात झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. बघता बघता दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण सुयशने त्याच्या आणि आयुषीच्या नात्याबद्दल बरीच गुप्तता बाळगली होती. त्यानंतर त्याने थेट साखरपुड्याचे फोटोज शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं.
====
हे देखील वाचा: सुयशची आठवणींसोबत सायकलफेरी
====
सुशय टिळक हे नाव ‘का रे दुरावा’ या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. ‘का रे दुरावा’ या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अलीकडेच त्याने अभिनेत्री सायली संजीव सोबत शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतही काम केलं आहे. लॉकडाऊनमधील एका लग्नाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. मालिकेतील लग्नाची गोष्ट संपताच सुयश खऱ्या आयुष्यात आयुषीसोबत लग्नाच्या बेडीत अडकला.
– वेदश्री ताम्हणे