Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

जेव्हा अभिनेत्री Helan हिला अंडरवर्ल्ड डॉनने मदत केली होती!

ठरलं! मुख्यमंत्री शिवाजी रावच्या भूमिकेत पुन्हा दिसणार अनिल कपूर; Nayak

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Trailer: सासू-सुनेचं नात्यावर भाष्य करणाऱ्या

Shashank Ketkar नंतर ‘या’ कलाकारांनीही केली मंदार देवस्थळींची पोलखोल

A.R.Rehman : संगीत क्षेत्राचा बादशाह!

Kabhi Khushi Kabhie Gham चा दूसरा पार्ट येणार? करन जोहरने

Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’,नवीन टिझर झाला दाखल

 महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’,नवीन टिझर झाला दाखल
Swargandharva Sudhir Phadke
मिक्स मसाला

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’,नवीन टिझर झाला दाखल

by Team KalakrutiMedia 06/04/2024

संगीत प्रेमींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोक येत आहे. ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते, असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच ‘बाबुजीं’च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.(Swargandharva Sudhir Phadke)

Swargandharva Sudhir Phadke
Swargandharva Sudhir Phadke

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक आणि अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे म्हणजे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

Swargandharva Sudhir Phadke
Swargandharva Sudhir Phadke

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गाणी आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये पाहायला मिळणार आहे.”(Swargandharva Sudhir Phadke)

==============================

हे देखील वाचा: गौरव मोरेच्या‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण…

==============================

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress avinash narkar Celebrity News Marathi Movie marathi music mrunmayree deshpande Singer Sudhir Phadke sunil barve swargandharva-sudhir phadke
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.