Sri Sri Ravi Shankar : आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटात ‘हा’ अभिनेता

Gurucharan Singh कर्जात बुडालेल्या ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंगला कामाची गरज
टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक गाजलेला शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा (TMOC). मागील जवळपास १४ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हा शो आणि शो मधील कलाकार प्रत्येक प्रेक्षकांच्या घरातलेच झाले आहेत. या मालिकेतील जेठालालपासून ते अब्दूलपर्यंत सर्वच कलाकार अगदी आपल्या घरातले असल्यासारखेच सगळ्यांना वाटत आहे. मधल्या काही काळात मालिकेतील कलाकारांमध्ये अनेक बदल झाले, मात्र लोकप्रियता आजही टिकून आहे. (Gurucharan Singh)
याचा मालिकेतील कायम अति उत्साही, कायम मारामारी करण्यास तयार, रागीट म्हणजे रोशन सिंग सोढी. मालिकेत रोशन सिंग सोढी ही भूमिका आतापर्यंत दोन कलाकारांनी साकारली होती आणि आता बलविंदर सिंग सूरी (Balvinder Singh Suri) हा अभिनेता ही भूमिका साकारत आहे. मात्र आजही कायम मालिकेतील पहिला सोढी अर्थात गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) सोढीची आठवण कायम प्रेक्षक काढताना दिसतात. गुरुचरणने ही मालिका सोडून अनेक वर्ष झाले, मात्र आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे. (Entertainment mix masala)

मधल्या काही काळापासून गुरुचरण सिंग सोढी हा खूपच प्रकाशझोतात आला आहे. याचे कारण म्हणजे एकदा तो अचानक काही दिवस बेपत्ता झाला, त्यानंतर तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे चर्चेत आला आता सध्या तो त्याच्या खराब तब्येतीमुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा गुरुचरण त्याच्या मुलाखतीमुळे प्रकाशझोतात आला आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींवर भाष्य करत काही खुलासे देखील केले आहे. (Celebrity Interviews)
गुरुचरणच्या प्रकृतीमध्ये सुधारणा
गुरुचरण सिंगने ‘टाइम्स ऑफ इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मला सर्वांना गुरुपर्वाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्या दिवशी मी गुरुद्वारात जाणार होतो. पण अचानक माझी तब्येत बिघडली आणि मी बेशुद्ध झालो. मला हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टरांनी मला ग्लुकोज लावले होते. तेव्हा मी ठरवले की सर्वांना मी गुरुपर्वाच्या शुभेच्छा द्याव्या. म्हणून मी व्हिडिओ केला आणि माझा व्हिडिओ व्हायरल झाला. मला या व्हिडिओमुळे झालेल्या गोंधळाची काहीच माहिती नव्हती. मी जे काही करतो ते मनापासून करतो, मात्र दुर्दैवाने लोकं त्याचा चुकीचा अर्थ घेतात. आता मी बरा असून, माझे दैनंदिन आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे.”
अनप्रोफेशनल असण्याच्या अफवांवर व्यक्त केली नाराजगी

गुरुचरण सिंग पुढे म्हणाला, “एका बातमीत दावा केला होता की, मी ‘तारक मेहता’च्या सेटवर अनप्रोफेशनल वागायचो. मला हे वाचल्यानंतर खूप राग आला होता. या शोसाठी मी जवळपास माझ्या आयुष्यातली १३ – १४ वर्षे दिली. माझे काम अगदी मनापासून केले. माझ्या पाठीला गंभीर दुखापत होऊनही मी हॉस्पिटलमध्ये राहूनही काम केले. असे असूनही जेव्हा माझ्याबद्दल अशा गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हा मला खूप त्रास झाला. यातून बाहेर येण्यासाठी मला अध्यात्माने मोठी मदत केली. मी शांतपणे माझ्याबद्दल जे लिहिले होते ते वाचले. त्यात ‘सूत्रांनुसार’ अशा शब्द होता, मात्र त्यात कोणाचेही नाव नव्हते.
असित भाई तेव्हा नव्हते, म्हणून मी थेट आमचे क्रिएटिव्ह हेड सोहेल यांना फोन केला आणि त्यांना विचारले की त्यांच्यासोबत असे कधी घडले आहे का? ते त्यावर नाही म्हणाले. मग मी त्यांना विनंती केली की, त्यांनी माझ्यासोबत एक लाईव्ह सेशन करावे आणि मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे, याबद्दल खरे सांगावे. नाहीतर, मला असेच वाटेल की, ती बातमी त्याच्याकडून आली आहे. सोहेल यांनी होकार दिला, माझ्यासोबत लाईव्ह सेशन केले आणि सत्य सांगितले. माझे काम हीच माझी पूजा आहे. कोणावरही कोणी खोटे आरोप करू शकत नाही.”
==============
हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!
==============
नवीन काम करायचे आणि कामाची गरज
गुरुचरण सिंग म्हणाला की, “भक्ती माझी जवळची मैत्रीण आहे. तिने मला कायम मदत केली आणि पाठिंबा दिला. पण मला दरमहा विशिष्ट रक्कम मिळेल असे काम करायची. ते मिळवण्यासाठी मला मदत हवी आहे. मी चांगले आणि मला आवडणारे काम शोधत आहे. तारक मेहता यशस्वी झाले, कारण संपूर्ण कुटुंब एकत्र बसून तो शो पाहू शकतो. मी त्यांचा ऋणी आहे. माझ्यावर खूप कर्ज आहे. मी कर्ज घेतले म्हणून मलाच ते फेडायचे आहे. “