Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Disha Vakani : अखेर ‘तारक मेहता….’ मधील दयाबेनचा शोध संपला!
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashma) मालिका दयाबेन आणि जेठालाल यांचायशिवाय कल्पना करणं अवघडचं आहे. आजही प्रेक्षक आवडीने युट्यूबवर जुने एपिसोड आवडीने पाहतात. मात्र, दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानीच्या एक्झिटनंत काहीसा मालिकेचा घसरलेला टीआरपी जेठालाल ने आपल्या खांद्यावर टिकवून ठेवला दया मालिकेत नसूनही तिच्या असण्याचा भास मालिकेतील प्रत्येक कलाकाराने करवून दिला. दया परत येणार असं गेले अनेक वर्ष सांगितलं जात होतं खरं पण आता अखेर दयाबेन मालिकेत परत येणार असल्याचं सांगण्यात आलं असून मॉक शुटींग सुरु झालं आहे. (Entertainment news)
गेल्या १६-१७ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. प्रेक्षकही सुरुवातीपासून या मालिकेवर भरघोस प्रेम करताना पाहायला मिळत आहेत.मालिकेत दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने उत्कृष्टरीत्या सादर केली. जेठालाल (Jethalal) म्हणजे दिलीप जोशीबरोबर दिशाची जोडी चांगलीच जमली होती. पण, २०१८मध्ये दिशा वकानी वैयक्तिक कारणासाठठी सुट्टीवर गेली ती परतलीच नाही. असित मोदींनी अनेकदा दिशाला पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना काही यश मिळालं नाही. पण आता या मालिकेत दिशाची जागा घेण्यासाठी नवीन दयाबेन भेटली आहे. (Entertainment)

मिळालेल्या माहितीनुसार, दयाबेनच्या (dayaben) भूमिकेसाठी ऑडिशन घेणाऱ्या असित मोदींना एक अभिनेत्री पसंत पडली आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी योग्य असणाऱ्या या अभिनेत्रीला शॉर्टलिस्ट केलं गेलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, टीमने नव्या दयाबेनसह मॉक शूटला सुरुवात केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असित मोदी यांना या अभिनेत्रीनं दयाबेनच्या भूमिकेसाठी दिलेलं ऑडिशन खूप आवडलं आहे आणि ते इम्प्रेस झाले आहेत. त्यामुळे आता ही अभिनेत्री आठवडाभरापासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या टीमबरोबर शूट करीत आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर अखेर दयाबेन परतणार असून दिशा वकानी इतकी तिला पसंती मिळेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Taarak Mehta ka ooltah chashmah Serial)