मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!
मराठी चित्रपटांसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत… विशेष म्हणजे प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद या नव्या कलाकृतींना मिळत असून हिंदी कलाकार देखील मराठी नाटकांचं कौतुक करत आहेत… काही दिवसांपूर्वीच ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाचं कौतुक अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी केलं होतं.. आणि आता अभिनेत्री तब्बू हिने देखील मराठी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावत कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे…(Bollywood)

२ वाजून २२ मिनिटं या मराठी नाटकाच्या प्रयोगाला तब्बू (Tabu) उपस्थित होती… प्रयोगानंतर तब्बूने कलाकारांचं कौतुक तर केलंच पण अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) याचं विशेष कौतुक केलं… आता हिंदी कलाकार णि त्यातही तब्बू जर का आपल्या अभिनयाला दाद देत असेल तर कोणता कलाकार आनंदी होणार नाही? तब्बूच्या कौतुकानंतर प्रियदर्शनने सोशल मिडिया पोस्ट करत लिहिलं आहे की, “२ वाजून २२ मिनिटांनीच्या १००व्या प्रयोगाला तब्बू आली होती. मला म्हणाली – You’re too good !”. ‘माचिस’,’ हेराफेरी’, ‘अस्तित्व’, ‘विरासत’, ‘हुतूतू’, ‘चांदणी बार’, ‘मकबूल’, ‘चिनी कम’, ‘हैदर’, ‘The namesake’, ‘इरुवर’, ‘बिवी नं १’, ‘दृश्यम’ आणि अशा कित्येक उत्तम सिनेमात जिने अफलातून काम केलं अशा नटीनं You’re too good म्हटलं …. लई झालं भावांनो ! नाटक पाहून कुणी कौतुक केलं की 2-4 दिवस जरा वजन वाढतं…. तेवढं चालतंय…. नाहीतर आमचं वजन वाढणार तरी कधी?”. (Marathi Natak)
================================
हे देखील वाचा : Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
=================================

दरम्यान, मराठी चित्रपटांचा डंका तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असतोच, शिवाय मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये कामं करताना दिसतात… परंतु, मराठी नाटकांचं आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांचं जर का हिंदीतील दिग्गज कलाकारांकडून कौतुक होत असेल तर ती नक्कीचट अभिमानास्पद बाब आहे…. ‘२ वाजून २२ मिनिटांनी’ या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे या जोडीचं हे नाटक असून या नाटकाचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ८ डिसेंबर रोजी करण्यात आला होता. या नाटकात अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, गौतमी देशपांडे रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi