Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

ताजिकिस्तानचा गायक Abdu Rozik लवकरच लग्न बंधनात अडकणार !
आपल्या क्यूट स्टाईलमुळे भारतातही खूप लोकप्रिय असलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया कोण आहे छोटे भाईजानची होणारी वधू. सलमान खानचा लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या 16 व्या सीझनमधून भारतात प्रसिद्धी मिळवलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक लग्न बंधनात अडकणार आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ज्यानंतर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे की, त्याला त्याचा आदर करणारी मुलगी सापडली आहे. या गोष्टीचं वर्णन कसं करावं हे समजत नसल्याचंही तो पुढे सांगतो. तसेच तो आपल्या सर्व चाहत्यांना अंगठी दाखवतो.(Abdu Rozik Wedding News)

हा व्हिडिओ पोस्ट करत अब्दू रोझिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी कधीच विचार केला नव्हता की मी इतका भाग्यवान आहे की मला माझे प्रेम मिळेल, जो माझा आदर करेल. मी किती आनंदी आहे हे शब्दात व्यक्त करू शकत नाही,’ असे सांगून तो म्हणाली की, त्याचे लग्न ७ जुलै रोजी होणार आहे. आता अब्दू रोजिकची होणारी वधू नेमकी कोण आहे? ती कुठून आली? याबाबत त्यांनी काहीही सांगितले नसले तरी याबाबत ची माहिती ही समोर आली आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दू शारजाहमधील एका अमिराती मुलीशी तो लग्न करणार आहे, जिचे नाव अमीरा आहे.

अब्दू रोझिकचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही खुप मोठी फॅन फॉलोइंग आहे. बिग बॉसमध्ये सामील होण्यापूर्वी त्याने दुबईच्या अमिराती शहरात सलमान खान, एआर रहमानसह अनेक बॉलिवूड स्टार्सची भेट घेतली आहे. पुढे तो ‘बिग बॉस १६‘चा भाग बनला आणि भारताही चाहते कमवले.
================================
===============================
भारतातले लोक त्याला छोटे भाईजान या नावानेही ओळखतात. आजच्या काळात अब्दू सोशल मीडियावर सेन्सेशन आहे. त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे. इन्स्टाग्रामवर ८२ लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो ही करतात. आता त्याच्या लग्नाच्या बातमीने त्याची होणारी बायको नेमकी कोण आहे याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे.