Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

Takumba Marathi Song: सुप्रसिद्ध कोरिओग्राफर Remo D’souza ने केले नोस्टालजिक सफर घडवणारे ‘एप्रिल मे ९९’चे ‘ताकुंबा’ साँग लाँच
Takumba Marathi Song: परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ! उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या रंगतदार वातावरणात ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर मुले टेन्शन फ्री असतात आणि मग त्यांचे आवडीचे दिवस सुरु होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत उनाडपणा, खेळ, गावभर फिरणे या सगळ्या नॉस्टॅलजीक क्षणांचा अनुभव या गाण्यातून मिळणार आहे. आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या धमाल, मस्ती आणि एनर्जीने भरलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून त्यांचाच जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुस्कर व गीतकार प्रशांत मडूपवार यांनी लिहिले आहेत. सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्टॅनली डिकॉस्टा यांनी केले आहे.(Takumba Marathi Song)

या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे यानिमित्ताने रोहन, मापुस्कर राजेश मापुस्कर, रेमो डिसूझा, मधुकर कोटीयन आणि स्टॅनली डिकॅास्टा हे एकत्र आले आहेत. करिअरला सुरूवात केल्यापासून यांची घट्ट मैत्री आहे. यानिमित्ताने मैत्रीच्या चित्रपटासाठी मित्र पुन्हा भेटले.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्यांच्याच आठवणीतल्या असतात. ‘ताकुंबा’ या गाण्यात उन्हाळ्याच्या सुट्टीतील मित्रांसोबतची मजा पाहायला आणि अनुभवायला मिळेल. हे गाणे करताना आम्हालाही आमच्या उन्हाळी सुट्ट्यांचे मित्रांबरोबरचे काही खास क्षण आठवले. यामुळे गाणे करताना आम्हालाही खूप मजा आली. मुळात आता परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे हे सुट्टीचे मजेदार गाणे ऐकून तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना नक्कीच उधाण येईल, याची मला खात्री आहे.” (Takumba Maratho Song)
=====================================
=====================================
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.