Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास !
मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच वेगळ्या विषयांवर प्रयोग करत आली आहे. या परंपरेला पुढे नेत, “टँगो मल्हार” हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक नवी दृष्टी घेऊन येतो आहे. अर्जेंटिनातील प्रसिद्ध टँगो नृत्यप्रकारामुळे एका सर्वसामान्य मराठी रिक्षाचालकाच्या आयुष्यात घडणारा बदल ही या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे. १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट केवळ नावानेच नाही तर संकल्पनेनेही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतो आहे.(Tango Malhar Movie Trailer)

कथानकाचा नायक मल्हार हा साधा, संघर्ष करणारा पण मनाने प्रामाणिक माणूस. त्याच्या आयुष्यात अचानक टँगो नृत्य येतं आणि त्याच्या जगण्याला एक नवं वळण मिळतं. सुरुवातीला अनोळखी आणि परदेशी वाटणारं हे नृत्य, हळूहळू मल्हारच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतं. या प्रवासात त्याला मिळणारी ओळख, नवीन नाती, मैत्री आणि प्रेम यामुळे त्याचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. एका वेगळ्या कलेतून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलू शकते याचं उत्तम उदाहरण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधूनच हे जाणवतं की “टँगो मल्हार” केवळ नृत्यावर आधारित चित्रपट नसून भावनांनी ओथंबलेली कथा आहे. प्रत्येक फ्रेममध्ये नातेसंबंधांचे विविध रंग दिसतात. संगीत, छायांकन, संकलन या सर्व तांत्रिक बाबींवर कसोशीने मेहनत घेतलेली जाणवते. त्यामुळे चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवताना प्रेक्षकांची एक वेगळीच सफर होणार आहे.

या चित्रपटामागची प्रेरणादायी गोष्ट म्हणजे दिग्दर्शिका साया दाते. मूळच्या कम्प्युटर इंजिनिअर आणि उद्योजक असलेल्या साया दाते यांनी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पहिलेच पाऊल टाकलं आहे आणि तेही दमदारपणे. त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी सांभाळली आहे. मनीष धर्मानी यांनीही लेखनात सहभाग घेतला आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांचं कॅमेरामागचं काम, क्षमा पाडळकर यांचं संकलन, तर शार्दूल बापट आणि उदयन कानडे यांचं संगीत या सर्व गोष्टी चित्रपट अधिक समृद्ध करतात.(Tango Malhar Movie Trailer)
===================================
हे देखील वाचा: मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी !
===================================
कलाकारांच्या यादीत नीतेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी आणि पंकज सोनावणे अशा अनेक दिग्गजांसोबतच तरुण कलाकारांचीही साथ आहे. त्यांचं अभिनय कौशल्य या अनोख्या कथेला जिवंत करतं. एक साधा रिक्षाचालक आणि एक आंतरराष्ट्रीय नृत्यप्रकार यांचा संगम प्रेक्षकांना आयुष्याबद्दल नवी शिकवण देणारा ठरेल यात शंका नाही. “टँगो मल्हार” हा फक्त मनोरंजनाचं साधन नसून आशा, प्रेम आणि आत्मविश्वासाचा संदेश देणारा चित्रपट आहे.