
Tanya Mittal ने घेतली प्रेमानंद महाराजांची भेट ; सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना दिले अपडेट
‘Bigg Boss 19’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली तान्या मित्तल (Tanya Mittal) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शोच्या फायनलपर्यंत मजल मारलेल्या तान्याने बिग बॉसच्या घरात आपल्या स्पष्ट मतांमुळे, आत्मविश्वासामुळे आणि ठाम भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. शो संपल्यानंतर अनेक स्पर्धक ग्लॅमर, पार्टीज आणि सोशल गॅदरिंगमध्ये व्यस्त असताना, तान्याने मात्र अध्यात्माचा मार्ग निवडत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी पार पडला, ज्यामध्ये गौरव खन्ना विजेता ठरला. शो संपल्यानंतरही तान्या सातत्याने चर्चेत राहिली आहे. नुकतीच ती पवित्र नगरी वृंदावन येथे दाखल झाली, जिथे तिने आधी श्री राधा वल्लभ मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ती प्रेमानंद महाराज जी (Premanand Maharaj) यांच्या आश्रमात पोहोचली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.(Tanya Mittal)

या खास भेटीचा व्हिडिओ तान्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तान्या आपल्या कुटुंबीयांसोबत प्रेमानंद महाराज जी यांची भेट घेताना दिसते. या भेटीदरम्यान तिच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधान आणि आनंद चाहत्यांच्या मनाला भावला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तान्याने एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने आपल्या भाऊ-भावजयी, कुटुंबातील इतर सदस्य आणि आपल्या संस्कारांचा उल्लेख करत, ही भेट तिच्यासाठी किती खास आहे हे शब्दांत मांडले आहे. तान्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला असून, अनेकांनी तिच्या विचारांची आणि अध्यात्मिक प्रवृत्तीची प्रशंसा केली आहे.

‘बिग बॉस 19’मध्ये असताना तान्या अनेकदा आपल्या मोठ्या वक्तव्यांमुळे आणि निर्भीड मतांमुळे चर्चेत राहिली होती. काही वेळा तिच्या भूमिकांवर टीकाही झाली, मात्र शो संपल्यानंतर तिने निवडलेला शांत, आध्यात्मिक मार्ग अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. सोशल मीडियावर लाखो चाहते तिच्या या बदललेल्या रूपाचं कौतुक करत आहेत आणि तिला सतत पाठिंबा देताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान तान्याने प्रेमानंद महाराज जी यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, किंवा तिने कोणते प्रश्न विचारले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या क्षणांवरून ही भेट तिच्यासाठी अत्यंत भावनिक आणि समाधान देणारी होती, हे नक्की. (Tanya Mittal)
================================
================================
एकीकडे करिअर, काम आणि प्रसिद्धीचा प्रवास सुरू असतानाच, दुसरीकडे अध्यात्माची जोड देत स्वतःला संतुलित ठेवण्याचा तान्याचा प्रयत्न अनेकांना भावतो आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही मुळाशी जोडलेले राहणे, हीच गोष्ट तान्या मित्तलला इतरांपेक्षा वेगळी ठरवत आहे.