‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Tarak Mehta Ka Oolta Chasma मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता बेपत्ता,पोलिसांनी दाखल केला अपहरणाचा गुन्हा
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय कॉमेडी टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरचरण सिंग बेपत्ता झाले आहेत. गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता आहेत , त्यांचे वडील हरजीत सिंग यांनी पोलिसांत गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हरजीत सिंग यांनी आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केल्याचे सांगितले. गुरुचरणच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्याला पूर्ण सहकार्य केले आणि त्वरित कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे घेतली आणि लवकरात लवकर तपास करण्याचे आश्वासन ही त्यांना दिले. वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला गेला होता. मात्र त्यांचा मुलगा अद्याप मुंबईत पोहोचलेलाच नाही.(Tarak Mehta Ka Oolta Actor Missing)
हरजीत सिंह यांनी सांगितले की “एसएचओने मला वैयक्तिकरित्या फोन केला आणि आश्वासन दिले की ते लवकरच त्याला शोधतील. मला आशा आहे की तो सध्या जिथे आहे तिथे चांगला आणि आनंदी असेल,” हरजीत ने यांना त्यांची पत्नी आणि गुरचरण सिंगच्या आईच्या तब्येतीबद्दल ही माहिती दिली. सोशल मीडियावर बाप-लेकाचा सेल्फी फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात म्हटले जात आहे की, गुरचरण सिंगने घराबाहेर पडण्यापूर्वी वडिलांसोबत हा शेवटचा फोटो काढला होता. सोशल मीडियावर चाहते देखील पोलिसांना त्याला शोधण्याची विनंती करत आहेत आणि अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आपल्या प्राथमिक तपासात म्हटले आहे की, 50 वर्षीय टीव्ही अभिनेता 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार होता. मात्र, ते मुंबईला गेले नाहीत.
==================================
==================================
२४ एप्रिलपर्यंत त्याचा नंबर अॅक्टिव्ह होता, त्यातून अनेक व्यवहारही झाले. गुरचरण सिंग यांचे अपहरण झाले आहे की ते बेपत्ता झाले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. कौटुंबिक शत्रू आणि परस्पर वैमनस्य या अँगलचाही तपास आता पोलिस करत आहेत.