‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ते नव्हं..
ते डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय, अव म्हंजे ते काय म्हणत्यात त्याला….. हा, ते हास्पिटल बुलेटिन.. ते आल्याशिवाय काय खरं नसतं?
.. म्हणजे, ते निशिकांत कामतसाहेबांच्या बातमीचं जे झालं ते बघितलंच आम्ही. पण तेच्यासाठी डॉक्टरांनी दुजोरा देणं इतकं गरजेचं असेल तर मग सगळ्याच डॉक्टरी गोष्टी तपासून बघू की एकदा.
फार खोलात जाऊ नका. डॉक्टरी गोष्टी तपासायला हव्यात असं म्हणालो आम्ही. कंपाऊंडरी गोष्टी म्हटलेलं नाही. उगाच नको तो विषय इथे काढू नका. कारण, डॉक्टर विश्वासू की कंपाऊंडर.. हा आत्ता आपल्या चर्चेचा विषय नाही.
विषय होता डॉक्टरांनी दुजोरा देण्याचा.. निशिकांत कामत यांच्यावरून जे महाभारत काही तासांत घडलं ते बघितलं आपण. पण तोच न्याय आपल्या संजूबाबाला लावा की.
लावायला नको?
आता सगळे मिडियावाले म्हणाले, श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे संजू बाबाला लिलावतीमध्ये नेलं. तिथे त्याच्यावर कोव्हिड टेस्ट झाली. मग ती निगेटिव्ह आली म्हटल्यावर बाबाला घरी सोडंल.
पण बाबा घरी परतायच्या आत नव्या बातमीने जन्म घेतला होता..
बातमी होती संजूबाबाला लंग कॅन्सर झालाय.
बाबाला लंग कॅन्सर झाला आहे आणि त्याला उपचारादाखल अमेरिकेत जायचं आहे असं मीडियावाले सांगत होते.
मग आता सांगा, कोण म्हणालं बाबाला लंग कॅन्सर झाला म्हणून?
कुठल्या डॉक्टरांनी याला दुजोरा दिला का हो? त्यांनी तसं जाहीर सांगितलं का? का नाही सांगितलं?
जर नसेल सांगितलं तर मग मीडियाला ही बातमी कुणी दिली? का दिली? बरं दिली ते दिली वर हा कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा आहे असंही बजावून ठेवलंय त्यांनी.
मग आता याची खातरजमा नको का करायला… का उगाच उठली बातमी म्हणून लावायची टीव्हीला..
तर आता यातून धडा घ्यायला हवा. पहिलं त्या संजूबाबाला पकडायला हवं. आजपण बाबा लिलावतीला गेला होता चेकअपसाठी. तर त्याला लगेच डिस्चार्ज दिलाय तिकडून.
मग खरंच बाबाला लंग कॅन्सर आहे… का कुछ नया नौटंकी है यह?
असू शकतं बर का.. हे बॉलिवूडवाले काहीही करू शकतात. प्रमोशनसाठी काहीही करू शकतं हे पब्लिक.
आपल्या मराठीत नाही का, त्या विश्वासरावांच्या अनिकेतने आपण लुबाडलो गेल्याचं एक नाटक केलं होतं? मग कळलं… सिनेमाचं प्रमोशन होतं ते.
एवढंच कशाला, अंकुश, सई, सिद्धार्थ यांनी केलेलं ‘पुन्हा निवडणूक’ हे कॅम्पेनही माहीत असेलच की…
मग.. तसंच काहीतरी प्रमोशन नसेल कशावरून?
कारण सडक २ येतोय. ऑलरेडी सगळं पब्लिक आलिया, संजू, महेश भट्टवर वैतागलं आहे. बाबाला कॅन्सर झाल्याचं कळल्यावर लगेच रणबीर, अलिया त्याला भेटून आले.
कशावरून ते ब्रह्मास्त्रचं प्रमोशन नसेल.
अहो, मानेंच्या मनाला पडलेले प्रश्न आहेत हो हे… मानेंच्या म्हणजे या धनंजय मानेंच्या.
म्हणजे, बाबाचा कॅन्सर आणि त्याची अलिया-रणबीरने घेतलेली भेट..
हे सडक २ आणि ब्रह्मास्त्र असं मिळून प्रमोशन आहे की काय..
असं वाटण्याइतपत मजल गेली राव आपली.
मन फार वाईट असतं. काहीही विचार करतं!!!
त्यात दिल बेचाराने तुफान व्ह्यू मिळवले आहेत. त्याच धर्तीवर सहानुभूती मिळवण्यासाठी संजूबाबाने हे पाऊल उचललं नसेल कशावरून?
बरं.. नसेलही उचललं.. तर मग कुठल्या तरी डॉक्टरने.. हॉस्पिटलने खरंच संजूबाबाला लंग कॅन्सर झालाय हे दाखवून द्यावं की.
त्याला असा रोग होऊ नये अशीच मनापासून इच्छा आहे मानेंची.. आणि हो, झालाच असेल तर डॉक्टर सांगतीलच की..
उगीच बतम्यांचा धुरळा कशा पाई उडवायचा….. लोकांच्या भावना दुखावतात की राव!
निशिकांत कामतच्या बातमीवरून आता शहाणं व्हायचं आपण. कोणतीही मेडिकल गोष्ट असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांनी सागू देत मगच आपण विश्वास ठेवणार हे आमचं ठरलंय.
तुम्ही काय करणार आहात?
धनंजय माने