Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत

“भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी…”, Dharmendra यांनी व्यक्त केली होती ‘ही’ शेवटची इच्छा
बॉलिवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ (Ikkis) येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… २४ नोव्हेंबर त्याचं निधन झालं आणि संपूर्ण बॉलिवूड हळहळलं.. परंतु, जाता जाता आपल्या चाहत्यांसाठी ते ‘इक्कीस’च्या निमित्ताने खास भेटवस्तू देऊन गेले आहेत… शेवटच्या क्षणापर्यंत धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही.. या चित्रपटासंदर्भातच त्यांचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.. यात धर्मेंद्र काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… (Bollywood News)

तर, ‘इक्कीस’ चित्रपटाच्या टीमने धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ रिलीज केला आहे… या व्हिडिओत धर्मेंद्र यांनी ‘इक्कीस’ हा चित्रपट भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी पाहावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, “मॅडॉक फिल्मसोबत काम करून मी आनंदी आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी चित्रपट खूप छान बनवला आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील लोकांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. आज चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी आनंदीही आहे आणि दु:खीही…तुम्हा सगळ्यांना खूप सारं प्रेम. काही चुकलं असेल तर माफ करा”. (Ikkis Movie and Dharmendra)

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या या ‘इक्कीस’ चित्रपटात जयदीप अहलावत आणि अगस्त्य नंदा (Agatsya Nanda) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत… या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे… या चित्रपटाआधी धर्मेंद्र यांनी ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’, ‘यमला पगला दीवाना फिरसे’ अशा अनेक चित्रपटांत कामं केली होती… (Dharmendra Movies)
================================
हे देखील वाचा : “तुमच्या मिठीत मला कायम सुरक्षित वाटायचं”; Esha Deol हिची धर्मेंद्रंसाठी भावूक पोस्ट
================================
बॉलिवूडमध्ये ६५ वर्ष सातत्याने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी १९५४ मध्ये म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. ४५ वर्षांच्या सुखाच्या संसारात त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही…’शोले’, ‘सीता और गीता’, ‘नसीब’, ‘अंधा कानून’, ‘छोटी सी बात’, ‘भागवत’, ‘राजा जानी’, ‘सम्राट’, ‘किनारा’, ‘ड्रिम गर्ल’ अशा अनेक चित्रपटांची दोघांनी एकत्र काम केलं होतं… (Dharmendra and Hema Malini)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi