Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!

 मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!
Actress Tejaswini Pandit
मिक्स मसाला

मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!

by Team KalakrutiMedia 06/04/2024

मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.(Actress Tejaswini Pandit)

Actress Tejaswini Pandit
Actress Tejaswini Pandit

 मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे, हे नक्की! 

Actress Tejaswini Pandit
Actress Tejaswini Pandit

आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवाला म्हणतात, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.”(Actress Tejaswini Pandit)

==============================

हे देखील वाचा: Deepika Padukoneच्या गाण्याने रचला इतिहास, अकादमी पुरस्कारांनी केला ‘या’ गाण्याचा सन्मान…

==============================

 या भागीदारीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ” ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो. आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी ‘गेम चेन्जर’ ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. ”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Tejaswini Pandit Celebrity News Entertainment Marathi Movie sajid nadiadwala
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.