महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘येक नंबर’ मध्ये अभिनेत्री ,निर्माती आता लेखिकेच्या भूमिकेतून येणार समोर
तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी, अभ्यासू अभिनेत्री. पडद्यावर आपण तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहातच असतो. परंतु यावेळी तेजस्विनी वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्विनी लिखाण क्षेत्रात पदार्पण केले आहे. निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त तिचा अभिनयही यात पाहायला मिळत आहे. तेजस्विनी यात पोलिसाच्या भूमिकेत झळकली असून पहिल्यांदाच ती या व्यक्तिरेखेत दिसत आहे. एकाचवेळी अशा तिहेरी भूमिकेत पाहाणे, म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.(Actress Tejaswini Pandit)
आपल्या या तिहेरी भूमिकेबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘’लिखाणाची आवड पूर्वीपासून होतीच, फक्त आधी स्वतःपुरत लिहायचे आता सिनेमासाठी लिहिलंय. खरंतर व्यक्त होणं गरजेचं असतं. काय व्यक्त होताय ह्यावर प्लॅटफॉर्म ठरतो. मला हा विषय खूप मोठ्या स्केलवर दिसत होता म्हणून मी यावेळेला सिनेमा ह्या माध्यमामधून व्यक्त व्हायचं ठरवलं. मोठी जबाबदारी होती आणि प्रामाणिकपणे ती पार पाडायचा प्रयत्न केलाय. मला खात्री आहे प्रेक्षकांना माझी ही भूमिका सुद्धा आवडेल “ झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(Actress Tejaswini Pandit)
=================================
==================================
या चित्रपटात प्रेक्षकांना सुंदर प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या गाण्यात धैर्य प्रथमच एका वेगळ्या अंदाजात दिसत असून सायली -धैर्यची कमाल केमिस्ट्री यातून पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातील प्रेमकहाणी असावी, इतक्या सुंदररित्या हे गाणे चित्रित करण्यात आले असून प्रत्येक प्रेमीयुगुलाला जादुई नगरीची सफर घडवणारे हे गाणे आहे. चित्रपटाची ही दुसरी बाजूही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे.