Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

बिग बॉसच्या घरातून Rakhi Sawant हिची हकालपट्टी की नवा ट्विस्ट?

Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela

“त्याच्या ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का?”; पिळगांवकरांच्या ट्रोलर्सला Ashok

Apurva Nemlekar Wedding: अपूर्वा नेमळेकरचा जीवनसाथी तनुज गोवळकर नेमका आहे

अमिताभ बच्चनच्या ‘दोस्ताना’ सिनेमात Starughan Sinha ची एन्ट्री कशी झाली?

Apurva Nemlekar हिने व्हेलेंटाईनच्या दिवशीच बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत

तरुणाईच्या नात्यांची दाखवणाऱ्या‘Girlfriend Boyfriend’ सिनेमाची घोषणा; शिवानी बावकर, निखिल वैरागकर

बाल्कनीत बसणाऱ्या दोघांचा गेम झाला; Big Boss Marathi Season 6

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela Bhansali यांच्या ‘Jai Somnath’ सिनेमाची पहिली झलक चर्चेत

 Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela Bhansali यांच्या ‘Jai Somnath’ सिनेमाची पहिली झलक चर्चेत
Sanjay Leela Bhansali Jai Somnath
मिक्स मसाला

Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela Bhansali यांच्या ‘Jai Somnath’ सिनेमाची पहिली झलक चर्चेत

by Team KalakrutiMedia 16/02/2026

बॉलिवूडमधील भव्यदिव्य सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali पुन्हा एकदा ऐतिहासिक आशयाचा मोठा प्रकल्प घेऊन येत आहेत. त्यांच्या निर्मितीतून साकारत असलेल्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘जय सोमनाथ’ (Jai Somnath)  जो २०२७ साली जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा होताच चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच प्रदर्शित करण्यात आलेली पहिली झलक भव्य सेट्स, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आध्यात्मिक भावनेने परिपूर्ण आहे. “मंदिरे पाडता येतात, पण श्रद्धा नाही” ही प्रभावी ओळ चित्रपटाच्या गाभ्याबद्दल मोठा संकेत देते. या एका वाक्यातूनच कथा शक्ती, संघर्ष, विश्वास आणि इतिहासाच्या साक्षीदार ठरलेल्या भावनांभोवती फिरणार असल्याचे स्पष्ट होते.( Jai Somnath Teaser)

Jai Somnath Announcement
Sanjay Leela Bhansali Jai Somnath

या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक Ketan Mehta करणार आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे केतन मेहता आणि भन्साळी यांचे हे सहकार्य विशेष मानले जात आहे. दोन वेगळ्या शैलींचे, पण आशयघन सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले हे दिग्दर्शक एकत्र येत असल्याने अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. ‘जय सोमनाथ’ हे शीर्षक ऐतिहासिक Somnath Temple ची आठवण करून देते. शतकानुशतके आक्रमणांचा सामना करत पुन्हा उभे राहिलेले हे मंदिर भारतीय इतिहासातील श्रद्धा आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे चित्रपटात पौराणिक संदर्भांसह ऐतिहासिक घटनांचा वेध घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jai Somnath Announcement
Sanjay Leela Bhansali

सध्या कलाकारांची नावे किंवा कथानकाचे तपशील अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. मात्र भन्साळींच्या पूर्वीच्या चित्रपटांचा भव्य स्केल, समृद्ध दृश्यभाषा आणि भावनांनी ओथंबलेली मांडणी लक्षात घेता, ‘जय सोमनाथ’ देखील तितक्याच दिमाखात साकारला जाईल, अशी अपेक्षा आहे. निर्मितीसाठी मोठा कालावधी राखण्यात आल्याने सेट डिझाइन, संशोधन आणि तांत्रिक तयारी अत्यंत बारकाईने केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.(Jai Somnath Teaser)

==============================

हे देखील वाचा: Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट करत नव्या जोडप्याने व्यक्त केल्या भावना

==============================

२०२७ मधील प्रदर्शानाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आधीच चर्चेत आला आहे. श्रद्धा, इतिहास आणि मानवी जिद्दीची कथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच उत्सुक झाले आहेत. भव्य सिनेमॅटिक विश्व उभं करण्याची भन्साळींची हातोटी आणि केतन मेहतांचा आशयगर्भ दृष्टीकोन यांची सांगड ‘जय सोमनाथ’ला एक संस्मरणीय ऐतिहासिक चित्रपट ठरवू शकते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Historical Movie Bollywood Movie News Celebrity Entertainment Faith in Jai Somnath Historical Drama Bollywood Indian Epic Film Jai Somnath Jai Somnath First Look Jai Somnath Movie 2027 Jai Somnath Poster Jai Somnath Tagline Jai Somnath Teaser Sanjay Leela Bhansali Sanjay Leela Bhansali Movie Somnath Temple Upcoming Bollywood Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.