Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Shahshi Kapoor : तेरा मुझसे है पहले का नाता कोई….
कधी कधी अनपेक्षित पणे एखादी संधी कलावंताच्या वाट्याला येते आणि ती संधी त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकते. पार्श्वगायिका गायिका (पूर्वाश्रमी ची सुषमा श्रेष्ठ) यांच्याबाबत असं झालं होतं! खरं तर सुषमा श्रेष्ठ (जन्म ६ सप्टेंबर १९६०) सत्तरच्या दशकामध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सिनेमात आली होती. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिने पार्श्वगायनाला सुरुवात केली. पहिलं गाणं सुषमाने गायलं ते रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या सिनेमासाठी ‘है ना बोलो बोलो …’ पण तिच्या स्वराला खरी ओळख मिळाली मनमोहन देसाई यांच्या चित्रपटातील गाण्याने.

हा चित्रपट होता १९७३ सालचा ‘आ गले लग जा’. या चित्रपटाची गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन यांचं होतं. चित्रपटात शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एक फॅमिली ड्रामा चित्रपट होता. एका अपंग लहान मुलाची व त्याच्या आई वडलांच्या भावनिक नात्याची गोष्ट होती. या चित्रपटात एक गाणं दोन व्हर्शन मध्ये होतं. पहिलं व्हर्शन किशोर कुमार च्या स्वरात होते. गाण्याचे बोल होते ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई युंही नही दिल लुभाता कोई…’
याच गाण्याचं दुसरं व्हर्शन किशोर कुमार आणि एका बालकलाकाराच्या स्वरात रेकॉर्ड करायचं होतं. कारण चित्रपटांमध्ये हे गाणे शशी कपूर आणि त्याच्या छोट्या मुलावर चित्रित होणार होते. किशोर कुमार सोबत जी गायिका जाणार होती ती नेमकी त्या दिवशी आली नाही त्यामुळे पंचमने डमी रेकॉर्डिंग साठी सुषमा श्रेष्ठ ला बोलावले. सुषमा त्या वेळेला बारा वर्षाची होती. किशोर कुमार सोबत रिहर्सल सुरू झाली. किशोरने पंचमला विचारले ,” दादा कोई और गाने वाली थी न?” त्यावर पंचम म्हणाले,” हा लेकिन वो नही आई इसलिये हम डमी रेकॉर्डिंग करते है बाद में डब करवा लुंगा.” पण सुषमा चा आवाज किशोर कुमार ला खूप आवडला होता. किशोर कुमार पंचम ला म्हणाले,” यार पंचम डमी वमी कुछ नही. यही लडकी अब ये गाना गायेंगी. बहुत अच्छी आवाज है इसकी.” त्याने सुषमाला सांगितले ,” बेटा मन लगा के गाना!” आणि सुषमा श्रेष्ठ आणि किशोर कुमार यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड झालं! पण खरी गमंत पुढेच आहे.
किशोर कुमारला माहित नव्हतं ही मुलगी कोण आहे? सुषमा श्रेष्ठ ही जुन्या काळातील तबलावादक भोला श्रेष्ठ यांची मुलगी. भोला श्रेष्ठ हे बॉम्बे टॉकीज मध्ये किशोर कुमार चे चांगले मित्र होते. भोला श्रेष्ठ, आलोक दास गुप्ता, रुमाघोष आणि किशोर कुमार यांचा ग्रुप होता. रुमा गुहा यांनी तर भोला ला आपला भाऊच मानले होते. एका राखी पौर्णिमेला भोला रुमा गुहा कडे आले होते. तेव्हा रुमा गुहा ने त्यांना राखी बांधताना विचारले,” तुमचे दुसरे मित्र किशोर कुमार आले नाहीत?” त्यावर भोला ने सांगितले,” त्याला तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला नको आहे!” रुमा गुहा ने तेंव्हा पहिल्यांदा ओळखले किशोर कुमारच्या मनात काही वेगळंच चालू आहे! काही वर्षातच नंतर रुमा गुहा आणि किशोरचे लग्न झाले नंतरच्या काळात किशोर कुमार मोठे कलावंत झाले. भोला श्रेष्ठ मात्र फार उंची गाठू शकले नाहीत. १९७१ साली त्यांचे हृदयविकारांने निधन झाले. ही सर्व गोष्ट जेव्हा सुषमाच्या आईकडून किशोर कुमार यांना कळाले तेव्हा त्यांनी सुषमा श्रेष्ठ ला मिठीच मारली आणि म्हणाले ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई….’
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
सुषमा श्रेष्ठ ने नंतर रफी सोबत ‘हम किसीसे कम नही’ या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा हे गाणे गायले. या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चाइल्ड आर्टिस्ट वरून एडल्ट आर्टिस्ट होताना मात्र तिला संघर्ष करावा लागला. नुसता संघर्ष करावा लागला नाही तर तिला तिचे नाव देखील बदलावे लागले. आता तिने पूर्णिमा या नावाने पार्श्वगायन सुरू केले. ‘अंकुश’ या एन.चंद्रा यांच्या चित्रपटात तिने ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता…’ पुष्पा पागधरे सोबत ही प्रार्थना गायली. जी प्रचंड लोकप्रिय झाली. यानंतर देखील तिचा संघर्ष चालूच होता. १९९२ सालच्या ‘बोल राधा बोल’ या चित्रपटातील ‘तू तू तू तू तारा तोडो ना दिल हमारा…’ या गाण्यापासून तिला खरी लोकप्रियता मिळाली. नव्वद च्या दशकामध्ये पूर्णिमा प्रचंड गायली आणि गाजली . या काळात तिने प्रत्येक संगीतकारासोबत काम केले आणि जवळपास सर्व नायिकांना आपला प्लेबॅक दिला!