स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali Festival 2025) येऊन ठेपली आहे… फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई, खमंग फराळ हे सारं काही आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवाळी या सणाची वाट पाहात असते…. अशातच हिंदी आणि मराठीत दोन चित्रपटही रिलीज होणार आहेत… आता सण-सुद म्हटलं की लोकं एकमेकांना भेटण्यास जास्त प्राधान्य देतात, मग अशात चित्रपट नेमकं पाहायला जाणार तरी कोण? हा प्रश्न नक्कीच उद्भवतो… जाणून घेऊयात नेमके कोणते चित्रपट रिीलीज होणार आहेत त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद अंदाजे कसा मिळू शकतो?
तर, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधला पाचवा चित्रपट ‘थामा’ (Thama) २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि आयुष्यमान खुराना यांच्या प्रमुख भूमिका असून ही एक वॅम्पायर्सची स्टोरी असणार आहे… यात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाची भूमिका साकारणार असून परेश रावल देखील यात हटके भूमिकेत दिसणार आहे… आता तसं पाहायला गेलं तर ‘स्त्री’ (Stree Movie) फ्रेंचायझीमुळे प्रेक्षक हॉरर-कॉमेडी चित्रपटांचे चाहते नक्कीच झाले आहेत… त्यामुळे ‘थामा’ चित्रपटालाही सण आणि सुट्टी असूनही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळेल अशी शक्यता दिसते… शिवाय यात मलायका अरोरो आणि नोराचे २ आयटम सॉंग असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उस्तुकता निर्माण झाली आहे यात शंकाच नाही… (Rashmika Mandanna and AYushman Khurana)

विशेष म्हणजे मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समधला पहिला ‘स्त्री’ चित्रपट ३१ ऑगस्ट २०१८ मध्ये रिलीज झाला होता आणि त्यादिवशी दहीहंडी हा सण होता… ‘स्त्री २’ ज्या दिवशी रिलीज झाला तेव्हा राष्ट्रीय सण अर्थात स्वातंत्र्यदिन होता (१५ ऑगस्ट२०२४)… आणि ‘स्त्री १’ आणि ‘स्त्री २’ चे रेकॉर्ड पाहता थामा चित्रपटही प्रेक्षकांना सुट्टी असूनही आपल्याकडे आकर्षित करणार अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : साऊथच्या छायेत Bollywood हरवलं आहे का?
================================
तसेच, २१ ऑक्टोबर २०२५ या दिवशी ‘प्रेमाची गोष्ट २’ (Premachi Goshta 2) हा मराठी चित्रपटही रिलीज होणार आहे… ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे… आता ‘थामा’ सारख्या बिग बजेट चित्रपटापुढे प्रेमाची गोष्ट २ हा मराठी चित्रपट कितपत टिकू शकतो हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे… या आधी देखील बऱ्याच हिंदी आणि साऊथ चित्रपटांसमोर मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत… सध्या ‘कांतारा १’ समोर ‘दशावतार’ (Dashavatar) चित्रपटाने आपलं स्थान अढळ ठेवलं आहे… त्यामुळे आता ‘थामा’च्या पुढ्यात ‘प्रेमाची गोष्ट २’ टिकणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi